Anupam Kher Bollywood Actor  esakal
मनोरंजन

Anupam Kher Video : 'माझं टक्कल आहे भलतचं सुंदर'! अनुपम यांनी घेतला चक्क ४०० रुपयांचा कंगवा

अनुपम खेर यांच्या (Anupam Kher Video) त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांनी त्यांना दिलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Anupam kher funny VIDEO: बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटी असे आहेत की, त्यांना त्यांच्या मोठेपणाचा, प्रसिद्धीचा फारसा सोस नाही. ते (Anupam Kher Viral Video) मनमोकळपणानं आजुबाजूच्या लोकांमध्ये मिसळून जातात. त्यांच्याशी बोलताना दिसतात. त्यापैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर. सध्या त्यांचा एक व्हिडिओ हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

अनुपम यांच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले (Anupam Kher Latest News) आहे. खरं तर अनुमप हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आणि अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता त्यांनी एका रस्त्यावरील विक्रेत्याकडून चारशे रुपयांचा कंगवा घेत केलेली पोस्ट चर्चेत आहे.

त्या रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्याचे नाव राजू असे असून त्यांनी (Anupam Kher Insta Video) अनुपमला सांगितलं की, आज माझा जन्मदिवस आहे. आणि त्या निमित्तानं अनुमप यांनी त्यांच्याकडून कंगवा खरेदी केला. अनुपम यांनी मोठ्या गमतीनं तो व्हिडिओ शेयर करत, मला खरं तर कंगव्याची अजिबात गरज नाही, माझे टक्कलच किती सुंदर दिसते हे मला माहिती आहे. असे म्हटले आहे.

तो व्हिडिओ शेयर करताना त्यांनी लिहिलं आहे की, टक्कल असलं तरी (Latest Entertainment News) देखील खूप सुंदर... मुंबईमध्ये घडलेली ती मजेशीर घटना... राजू हा मुंबईतील रस्त्यावर कंगवा विकण्याचं काम करतो. खरं तर मला त्याच्याकडून कंगवा विकत घेण्याचं कोणतही कारण नव्हतं. मात्र त्याचा आज जन्मदिन असल्यानं मला त्याचे मन मोडता आले नाही. त्या निमित्तानं मी त्याच्याकडून कंगवा खरेदी केला. त्याची सुरुवात चांगली होईल मला याची खात्री आहे. मला माहिती आहे की, त्यानं आजवर त्याच्या आय़ुष्यात खूप चांगले दिवस पाहिले आहे.

राजूच्या चेहऱ्यावरील हसू हे मला सकारात्मक प्रेरणा देणार आहे. मला तुम्हालाही सांगायचे आहे की, तुम्ही जर त्याच्याकडे गेलात तर कंगवा नक्की खरेदी कराल. तुमच्या डोक्यावर केसं आहेत किंवा नाही यानं काहीही फरक पडत नाही. तो त्याच्या व्यक्तिमत्वानं तुम्हाला जिंकून घेईल एवढं मात्र नक्की.मी त्याच्याकडून एक कंगवा खरेदी केला आणि त्याला त्या कंगव्यासाठी ४०० रुपये दिले. त्यामुळे त्याच्यावर जो आनंद होता तो माझ्यासाठी फारच महत्वाचा होता. असे अनुमप यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी त्याच्याकडून पहिल्यांदा कंगवा घ्यायचा की नाही याचा विचार करत होतो. पण मी तो घेतल्यानंतर राजू एकदम टेन्शन फ्री झाल्याचे दिसून आले. राजूनंही खेर यांच्यासोबत अनेक गप्पागोष्टी केल्या. अनुपम यांनी शेयर केलेला तो व्हिडिओ चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT