Anupamaa Anuj Chemistry Esakal
मनोरंजन

Anupamaa Anuj Chemistry: अनुज- अनुपमाचं सुटलं भान! इंटिमेट सीन्सचा व्हिडिओ व्हायरल...ट्विटरवर चाहत्यांचा राडा

Vaishali Patil

अनुपमा ही टेलिव्हिजन मालिका सध्या खूप चर्चेत आहे. टेलिव्हिजन दर्शकांच्या आवडत्या शोपैकी एक असलेल्या 'अनुपमा'ने सुरुवातीपासूनच टीआरपीच्या यादीत आपले स्थान सातत्याने राखले आहे. शोची मुख्य अभिनेत्री अनुपमा आणि अनुज यांच्यात प्रेमाचं नातं अजून बहरणार आहे.

खरं तर गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अनुपमा आणि अनुज यांच्यात बराच काळ वाद सुरू होता.

तसेच कौटुंबिक वादावरून अनुपमा आणि अनुजमध्ये भांडण झाले होते. या सर्व गोष्टी विसरून पुढे जाण्यासाठी अनुपमाने अनुजला एक रोमँटिक सरप्राईज देण्याचा प्लॅन केला आहे. अनुपमा त्यांचे नाते पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसते.

निर्मात्यांनी 'अनुपमा' मधील अनुज आणि अनुपमाच्या पात्रातील एक इंटिमेट सीन दाखवण्याचा निर्णय घेतला आणि आता सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल होत आहेत. वास्तविक या मालिकेत अनुपमा आणि अनुज यांच्यातील रोमान्स दाखवण्यात आला आहे.

या मालिकेत त्यांच्यातील केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. या प्रसंगाचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक झालेले दिसत आहेत.

आता अनुपमा आणि अनुज यांच्यातील इंटिमेट सीनचे अनेक फोटो ट्विटरवर खूप व्हायरल होत आहेत. काही चाहते अशा दृश्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर बरेच लोक या इंटिमेट सीनबद्दल खूप आनंदी आहेत.

अनुपमाच्या लव्ह मेकिंग सीनवर अनेक जण तिला सुसंस्कृत सून म्हणत आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काही चाहत्यांना मालिकतील तिचं रोजची रडा रड बंद झाल्याने ते आनंदित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT