Anurag Dobhal comment on Munawar Faruqui news esakal
मनोरंजन

Munawar Faruqui : 'धर्माच्या नावाखाली तू मुलींना...' अनुरागचा बिग बॉस विजेता मुनव्वर फारुखीवर हल्लाबोल

बिग बॉस संपल्यानंतरही अनुरागचा मुनव्वरवरील (Munawar Faruqui ) राग हा काही शांत झालेला दिसत नाही.

युगंधर ताजणे

Anurag Dobhal comment on Munawar Faruqui : बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये विजेता ठरलेला मुनव्वर फारुखी आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. विजेता झाल्यानंतर वेगवेगळ्या कारणामुळे तो ट्रोल (Bigg Boss 17) झाल्याचे दिसून आले आहे. बिग बॉसमधील अनुराग डोभालनं (Anurag Dobhal Latest news) त्याच्यावर काही गंभीर आरोप केले असून त्यानं यावेळी शो मेकर्सवर देखील टीका केली आहे.

अनुरागनं बिग बॉस १७ हा बायस्ड शो असल्याचे म्हटले असून या शो मध्ये (Munawar Faruqui) अनेक गोष्टी फिक्स असतात असे सांगितले आहे. अनुरागनं त्याच्या बिग बॉसच्या जर्नीमध्ये अनेक मित्र जमवले तर काहींसोबत त्याचे खटके उडाल्याचे दिसून आले आहे. त्यात त्याची सर्वाधिक भांडणं होती ती मुनावर फारुखी सोबत. आताही त्यानं त्याच्याविषयी जे विधान केलं आहे त्यामुळे तो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

बिग बॉस संपल्यानंतरही त्यातील काही वाद अजुनही थांबलेले नाहीत. मुनव्वर फारूखीनही अनेकांसोबत पंगा घेतल्याचे दिसून आले आहे. शो च्या शेवटच्या सत्रात त्यानं माफी मागत ज्यांच्यासोबत भांडणं केली त्यांना जिंकून घेतले होते. मात्र या सगळ्यात त्याची अनुरासोबतची भांडणं कायम आहेत.

धर्माला उद्देशून केली कमेंट...

बिग बॉस १७ ची सुरुवातच मुळी अनुराग आणि मुनव्वरच्या भांडणानं झाली होती. शो मधून बाहेर पडल्यानंतर अनुरागनं अनेकदा लोकांमध्ये जाहीर वक्तव्य करुन लक्ष वेधून घेतले होते. त्यात त्यानं बिग बॉसला बायस्ड असे म्हटले होते. आता त्यानं मुनव्वर धर्माचा चूकीचा उपयोग करत असल्याचे आणि त्याचा फायदा घेत असल्याचे अनुरागनं म्हटले आहे.

मुनव्वरनं काही दिवसांपूर्वी आदित्य नारायणच्या कॉन्सर्टवर टिप्पणी केली होती. त्यावेळी उदित नारायण यांचे पापा कहते है या गाण्यावरुन आदित्यवर निशाणा साधला होता. या सगळ्यात अनुरागनं देखील मुनव्वरवर टीका केली आहे.

अनुरागनं एक्सवर पोस्ट करत मुनव्वरचे नाव न घेता म्हटले आहे की, पापा कहते है बेटा बडा नाम करेगा, धर्म आणि टू टायमिंगच्या नावाखाली स्टँड अप कॉमेडी करुन मुलींना फसवून त्यांना बदनाम करणार....अनुरागच्या त्या पोस्टची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : दरवर्षी सारखी जुहू चौपाटीवर गर्दी नाही

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT