Anurag Kashyap bans on Indigo travel  
मनोरंजन

कुणालवर बंदी घालणाऱ्या इंडिगोवर आता या कलाकाराने घातला बहिष्कार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मागच्या आठवड्यात इंडिगो विमान प्रवासात ज्येष्ठ पत्रकार व रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याशी गैरवर्तन केल्याने व विमानात असभ्य भाषेत संवाद साधल्याने कॉमेडियन कुणाल कामरावर इंडिगो व एअर इंडियाने सहा महिन्यांची बंदी घातली आहे. सोशल मीडियावर याबाबत तिव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी कुणालला पाठिंबा दर्शवला तर काहींनी कुणालचे वर्तन असभ्य असल्याचा आरोप केला आहे, आता या वादात दिग्दर्शक अनुराग कश्यपही उतरला आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्याच्या सामाजिक भूमिकेमुळे चांगलाच चर्चेत आलाय. अशातच पुन्हा एकदा कुणाल कामराला पाठिंबा देत त्याने पुन्हा एकदा आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. विमानातील असभ्य वर्तणूकीमुळे कुणालवर इंडिगो व एअर इंडियाने सहा महिन्यांसाठी प्रवासावर बंदी घातली आहे. या प्रत्युत्तर म्हणून अनुरागने स्वतःच इंडिगोच्या विमान प्रवासावर बहिष्कार घातलाय. ट्विट करून त्याने त्याचा बहिष्कार सोशल मीडियावर पोस्ट केला. 

मुंबईहून कोलकात्याला जाण्यासाठी इंडिगोचा प्रवास नाकारत त्याने पहाटे चार वाजता विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास केलाय. 7 तास वाट बघून त्याने विस्ताराच्या विमानाने जायचे ठरविले. त्याने हा निर्णय का घेतला याचे स्पष्टीकरणही अनुरागने दिले. कॉमेडियन कुणालवरील कारवाईचा निषेध म्हणून त्याने इंडिगोने न जाण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत इंडिगो त्याच्यावरील बंदी हटवत नाही, तोपर्यंत मी इंडिगोने प्रवास करणार नाही असे त्याने सांगितले. मी पहाटे उठून वेगळ्या विमानाने येईन पण इंडिगोने प्रवास करणार नाही, असेही स्पष्टीकरण त्याने यावेळी दिले.

सध्या अनुराग कश्यप चांगलाच चर्चेत असून सीएए आणि एनआरसीविरोधातही आंदोलने करताना दिसतोय. सोशल मीडियातून तो पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच तोंडसुख घेताना दिसतो. आता पुन्हा एकदा कुणाल कामराच्या वादात पडून तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT