Anurag Kashyap daughter Aaliyah  
मनोरंजन

अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराच्या धमक्या; त्या फोटोशूटमुळे केलं जातंय ट्रोल

स्वाती वेमूल

एका अंतर्वस्त्राच्या ब्रँडसाठी फोटोशूट केल्यानंतर बलात्काराच्या धमक्या येत असल्याचा खुलासा दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलियाने केला. सोशल मीडियावर अत्यंत घृणास्पद व अश्लील भाषेत टिप्पणीही केली जात असल्याची तक्रार तिने केली. धमक्यांनंतर तिने फोटोशूटसुद्धा हटवण्याचा विचार केला होता. सोशल मीडियावर पोस्ट लिहित आलियाने हे संपूर्ण प्रकरण सांगितलं. 

काय आहे आलियाची पोस्ट?
'माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी मागील काही आठवडे खूपच कठीण गेले आहेत. जेव्हापासून मी माझ्या फोटोशूटचा फोटो पोस्ट केला, तेव्हापासून माझ्यावर अत्यंत अर्वाच्च व अश्लील भाषेत टिप्पणी केली जात आहे. मी कधीच इतके घाबरले नव्हते. माझं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट करण्याचा विचार मी केला होता. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी त्याबद्दल मौन बाळगणार होती. मात्र अशा गोष्टी बोलून दाखवायची खरी गरज आहे. कारण अशाच गोष्टींमुळे भारतात आणि जगात इतर ठिकाणी बलात्काराच्या घटना घडतात', अशी पोस्ट आलियाने लिहिली. 

'मला आणि इतर महिलांना त्रास देणारे बहुतांश लोक हे ढोंगी आहेत. त्यांना असं वाटतं की ते नैतिकदृष्ट्या खूप उच्च स्थानावर आहेत, मात्र अशीच लोकं बलात्काराच्या घटनांना प्रोत्साहन देतात', असं लिहित आलियाने कमेंट्सचे स्क्रिनशॉट पोस्ट केले. 

आलियाने याआधीही सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं होतं. आलिया ही अनुराग कश्यप व त्याची पत्नी आरती बजाज यांची मुलगी आहे. आलियाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत चर्चा असताना तिच्या सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंगमध्येही मोठी वाढ होत आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर आलियाची खास मैत्रीण आहे. याशिवाय तिला अनेकदा शाहरुख खानचा मुलगा अबरामसोबतही पाहिलं गेलंय. २०१७ मध्ये तिने मुलींच्या शिक्षणाशी निगडीत विषयावर माहितीपट बनवला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Mumbai News: BKC मध्ये थरार! जिओ वर्ल्ड ड्राईव्हजवळ ७ फूट अजगर आढळला; पाहा व्हायरल व्हिडिओ

"काम करणारे लोक भिकारी नाहीत.." मानधन बुडवणाऱ्या निर्मात्यांवर संतापली निळू फुलेंची लेक

SCROLL FOR NEXT