Anushka Sharma
Anushka Sharma Google
मनोरंजन

'विराटसारखा फलंदाज समोर असेल तर...'; चाहत्याचा अनुष्काला सल्ला

प्रणाली मोरे

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 'चकदा एक्सप्रेस'(Chakda Xpress) या आपल्या आगामी सिनेमासाठी कंबर कसून तयार झाली आहे. ती या सिनेमात क्रिकेटर झुलन गोस्वामी(Julan Goswami) यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. हा एक बायोपिक आहे. त्यामुळे अनुष्का झुलन गोस्वामी यांची व्यक्तिरेखा साकारताना कुठलीही चूक आपल्याकडून होऊ नये,काही कमी राहू नये यासाठी सध्या क्रिकेटचे धडे घेतेय. त्यासाठी ती गोलंदाजीचा कसून सराव करताना दिसते आहे. आता एवढं तर तिला करावंच लागणार कारण झुलन गोस्वामी यांच्या नावावर महिला आतंरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात सर्वात जास्त विकेट घेतल्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. त्यामुळे सध्या अनेकदा नेट प्रॅक्टिस करतानाचे अनुष्काचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसत आहेत.

अनुष्कानं नुकताच तिच्या अधिकृ सोशल अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्या एका फोटोत तिच्या हातातील बॉल चा क्लोज अप फोटो आहे तर दुसऱ्या फोटोत ती गोलंदाजीच्या अॅक्शन मोडमध्ये असल्याचा फोटो आहे. तिनं त्या फोटोला पोस्ट करत लिहिलंय की, "Grip by grip #prep #ChakdaXpress." क्रिकेटर झुलन गोस्वामी यांनी देखील तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे की,“Very nice,” त्याचबरोबर त्यांनी थम्ब आयकॉनही दिला आहे. एका चाहत्यानं क्रिकेटर स्मृती मंधानाला अनुष्काची पोस्ट टॅग करीत लिहिलं आहे की,'स्मृती तुला कट्टर स्पर्धक मिळाला'. तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे की,'अनुष्का जरा विराट फलंदाजी करतानाही गोलंदाजीचा सराव कर एकदा'. तर एकानं तिच्या 'चकदा एकस्प्रेस' सिनेमाला आणखी एक नवं नाव सुचवलं आहे,ते म्हणजे 'अनुष्का एक्सप्रेस'.

अनुष्का लवकरच लंडनला सिनेमाच्या शूटिंगसाठी रवाना होणार असल्याचं कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार,'चकदा एक्सप्रेस' सिनेमातील खूप महत्त्वाचा भाग लंडनमध्ये शूट केला जाणार आहे. हा महिला क्रिकेट जगतावर बनणारा एक मोठा सिनेमा आहे त्यामुळे मेकर्स याला बनवताना कुठलीच कसर ठेवणार नाहीत हे नक्की. अनुष्कानंही या सिनेमा संदर्भात माहिती देताना मागे म्हटलं होतं की,'' ज्या काळात महिलांनी क्रिकेट खेळणं याचा विचारही फार आपल्याकडे केला जात नव्हता त्या काळात झुलन गोस्वामी यांनी क्रिकेटच्या जगतात पाऊल ठेवण्यासाठी संघर्ष केला. तो संघर्ष,ती जिद्द,ती मेहनत सारं या सिनेमात पहायला मिळणार आहे''.

'चकदा एकस्प्रेस'ची निर्मिती अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्नेश शर्माची आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स वर प्रदर्शित केला जाणार आहे. २०१८ नंतर जवळ-जवळ चार-पाच वर्षांनी अनुष्का सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणून भेटीस येणार आहे. दरम्यान,तिनं 'पाताललोक','बुलबुल' ची निर्मिती केली होती. आणखी ही अनेक नवीन प्रोजेक्ट्सच्या निर्मितीत अनुष्का व्यस्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT