Anushka Sharma Hometown Video Instagram
मनोरंजन

Anushka Sharma: शाळा,घर,सवंगड्यां सोबतच्या आठवणी..'या' शहरात गेलं अनुष्काचं बालपण..व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या लहानपणीच्या आठवणीत रमली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर बालपणीच्या आठवणींचा व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मध्यप्रदेशमध्ये आहे. अनुष्का- विराटनं उज्जैनच्या महाकाल मंदिरात भोलेनाथाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अनु्ष्कानं आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्याचं ठरवलं.

त्यामुळे अर्थात ती पोहोचली इंदौरमध्ये. इथल्या आर्मी कॅम्पसमध्ये अनुष्काचं बालपण गेलं. अनुष्कानं जेव्हा आपलं जुनं घर पाहिलं ,जिथे ती खेळली-मोठी झाली तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नाही.

अनुष्काची इच्छा होती की तिनं पुन्हा एकदा त्या गल्ल्यांमध्ये फिरण्याचा आनंद लुटावा जिथं तिचं बालपण गेलं आहे. आता अनुष्कानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.ज्याला प्रत्येकजण लाइक करत आहे. (Anushka Sharma Hometown Video)

अनुष्का शर्मानं तिच्या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, त्यात ती आपल्या बालपणीचा काळ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. ज्या गल्ल्यांमधनं ती हिंडली-फिरली त्या तिनं व्हिडीओत दाखवल्या आहेत.

अनुष्कानं ते घर देखील दाखवलं जिथे तिनं लहानपणीचा रम्य काळ घालवला आहे. व्हिडीओ शेअर करत अनुष्का शर्मानं लिहिलं आहे की, ''पुन्हा एकदा महूला..मध्यप्रदेशला आलेय. ती जागा,जिथे लहानपणी मी पहिल्यांदा स्विंमिंग शिकले. जिथे माझ्या भावानं बर्थ डे ला व्हिडीओ गेम माग असं म्हणत शक्कल लढवली..कारण नंतर तो व्हिडीओ गेम तोच खेळायचा''.

'' ही ती जागा..जिथे माझे वडील स्कूटर चालवायचे. ती जागा कायम माझ्या हृद्यात बंदिस्त राहील''.

अनुष्का शर्माच्या त्या व्हिडीओला पाहून प्रत्येकजण आपल्या जुन्या आठवणीत रमेल हे मात्र खरं.

हेही वाचा: परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

आर्मी कॅम्पसमध्ये आपल्या घरासमोर उभी राहून अनुष्कानं फोटो काढले आणि आपल्या शाळेतल्या आठवणींना ताजं केलं. अनुष्कानं आपल्या बालपणीच्या मैत्रिणीचं घरही दाखवलं,जिच्यासोबत ती खेळायची आणि अभ्यास करायची. हेच ते इन्दौरमधलं घरं जिथं अनुष्कानं आपल्या भविष्याची सुंदर स्वप्न रंगवली.

अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार शर्मा कर्नल होते. त्यामुळे देशातील अनेक शहरात त्यांच्या बदल्या व्हायच्या. पण इंदौर तिच्या मनाच्या अगदी जवळ आहे असा तिनं उल्लेख केला आहे. तिच्या बालपणीचा अधिक काळ इथे गेला आणि बालपणीच्या आठवणींना विसरणं शक्यच नाही असं देखील ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

Lasalgaon News : लासलगावमध्ये नायलॉन मांजाचा कहर; युवकाच्या तोंडाला २१ टाके

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT