Anushka Sharma Tax Row Bombay High Court not  esakal
मनोरंजन

Anushka Sharma Tax Row : अनुष्का शर्माच्या डोकेदुखीत वाढ, कोर्टानं सुनावलं!

काही दिवसांपूर्वी अनुष्कानं सेल टॅक्स खात्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती.

युगंधर ताजणे

Anushka Sharma Tax Row bombay High Court : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे, सडेतोड प्रतिक्रियांमुळे चर्चेत असते. आता मुंबई उच्च न्यायालयानं दिला पुन्हा एकदा सुनावले आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं आणि हटक्या स्टाईलनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनुष्काच्या अडचणीत आता वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

शाहरुखच्या रब ने बना दे जोडी पासून बॉलीवूडमध्ये इंट्री करणारी अनुष्का आता बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आता बॉलीवूडमधील नावाजलेली निर्माती देखील झाली आहे. तिनं वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. सध्या अनुष्का ही २०१२-१३ आणि २०१३ -१४ दरम्यान आयकरच्या नोटीशीमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्कानं सेल टॅक्स खात्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. चार याचिका दाखल केलेल्या अनुष्काला कोर्टाकडून मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

मुंबई उच्च न्यायालयानं अनुष्काला दिलासा दिलेला नाही. कोर्टानं आता अभिनेत्रीला महाराष्ट्र व्हॅल्यु अडेड टॅक्स अधिनियम अंतर्गत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात पुर्नयाचिका दाखल करण्यास सांगितले आहे. तर कोर्टानं महाराष्ट्र सेल्स टॅक्स विभागाच्यावतीनं महाराष्ट्र व्हॅल्यु अडेड टॅक्स अधिनियम अंतर्गत २०१२ ते १६ साठी जो आदेश काढला तो रद्द करण्यास सांगितला आहे.

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्कानं २०१२-१३ आणि २०१३ -१४ या वर्षांसाठी महाराष्ट्र व्हॅल्यु अडेड टॅक्स अधिनियम अंतर्गत माझगाव सेल्स टॅक्स विभागाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुष्काची कोर्टाची ही लढाई सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT