AnushKa Sharma,Virat Kohli, Bhawna Kohli Dhingra. Google
मनोरंजन

नणंदबाई गिफ्ट आवडलं बरं का!

अनुष्का शर्माने फोटो शेअर करीत मानले विराटच्या बहिणीचे आभार...

प्रणाली मोरे

सेलिब्रिटींनी लग्न केली की सुरुवातीला प्रत्येकाच्या मनात शंका येते ,'लग्न केलंय पण आता टीकेल कधीपर्यंत?' कारण ब-याचदा अनेक सेलिब्रिटींच्या लग्नानंतर एक-दोन वर्षांतच वेगळं होण्याच्या चर्चाही अधिक रंगतात. आता काही सीनियर सेलिब्रिटी कपल्स याला अपवाद नक्कीच आहेत. त्यांच्या रांगेत आता सध्यातरी अनुष्का शर्मा-विराट कोहली हे जोडपं जाऊन बसलं आहे. कारण अनुष्कानं (Anushka Sharma) लग्नानंतर सुन,आई,पत्नी म्हणून आपल्या जबाबदा-या चोख बजावल्या आहेत हे अनेक गोष्टींवरनं लक्षात येतं.

लग्नानंतर अनुष्का सिनेमात रमण्यापेक्षा कुटुंबासोबतच अधिक रमली. तिचं लग्न डिसेंबर २०१७ मध्ये झालं. त्यानंतर मात्र २०१८ मध्ये शाहरुख,कतरिनासोबतचा तिचा 'Zero' सिनेमा फक्त प्रदर्शित झाला. तिने अजूनतरी कोणताही नवा सिनेमा साइन केलेला नाही. दरम्यानच्या काळात तिनं एका गोड मुलीला जन्म देऊन आई होण्याची जबाबदारी स्विकारली. ती विराटसोबतही अनेकदा मुलीला घेऊन क्रिकेट टूर्सवर जाताना दिसते. यावरनं लक्षात येतंय की ती विराटला वेळ देतेय,पत्नीची भूमिकाही ती अतिशय चांगल्या पद्धतीनं साकारतेय. तर सून म्हणूनही ती अतिशय योग्य पद्धतीनं आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.

Anushka Sharma

अनुष्काचं आपल्या सासरच्यांसोबत खूप चांगलं पटतं. त्यातही विराटची बहीण भावना कोहली धिंग्रा हिच्यासोबत ती खूप खास बॉन्डिंग शेअर करते. नुकतेच विराटच्या बहीणीने अनुष्काला खूप सुंदर कानातल्यांचा जोड गिफ्ट केलाय. त्याचे काही फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर करीत आपल्या नणदेचे आभार मानले आहेत. ग्रीन आणि व्हाइट रंगाच्या कॉम्बिनेशनचे ते ट्रेडिशनल कानातले आहेत. त्या कानातल्यांच्या फोटोला तिनं कॅप्शन दिलंय की “There are beautiful Bhawna Kohli Dhingra''. अनुष्का आणि भावना एकमेकींसोबत वेळ घालवताना ब-याचदा दिसतात. काही दिवसांपूर्वी 'वमिकाचा फोटो शेअर करा' असं जेव्हा भावनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकांनी मेसेज केला होता तेव्हा भावनानं, ''विराट-अनुष्काच्या निर्णयाचा मी आदर करते. तेव्हा वमिकाचा फोटो मी शेअर करणार नाही. पण इतकंच सांगेन आपणही त्या दोघांच्या निर्णयाचा आदर करा. आणि हो,आमच्याकडे एक एंजल आली आहे''. असा मेसेज उत्तरादाखल पोस्ट केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT