Anushka Sharma's really pregnant hide baby bump New video goes viral with virat kohli  SAKAL
मनोरंजन

Anushka Sharma: गुड न्यूज खरी आहे तर! अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? व्हायरल व्हिडीओची चर्चा

अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, यात ती गरोदर असल्याचं समजतंय

Devendra Jadhav

Anushka Sharma Pregnancy News: अनुष्का शर्मा ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अनुष्काने आजवर विविध सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडलीय.

अनुष्काने अभिनेत्री म्हणुन कारकीर्द गाजवलीय. गेल्या काही दिवसात अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण आता ही गुड न्यूज खरी आहे असं समजतंय. अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यामुळे ती गरोदर आहे, यावर शिक्कामोर्तब झालंय.

अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. व्हिडीओत पाहायला मिळतं अनुष्का आणि विराट यांच्या आसपास सिक्युरीटी गार्ड दिसतात.

अनुष्काने बलून स्लीव्हसह काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. व्हिडीओ बघून अशी चर्चा सुरु झालीय की पोटावर हात ठेवुन अनुष्काने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न केलाय.

काही दिवसांपुर्वी हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच चाहत्यांना गोड बातमी देणार असल्याची चर्चा होती. अनुष्का आणि विराट लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहेत, असं सांगितलं जात होतं

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्यांदा पालक होणार असुन अनुष्का तिची दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करत असल्याची बातमी होती. पण गेल्या काही दिवसात या चर्चा अफवा असल्याचं दिसलं.

अशातच हा नवीन व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनुष्का शर्मा खरंच गरोदर आहे, असं बोललं जात आहे. अनुष्का - विराटकडून मात्र अधिकृत कोणताही खुलासा अजुन झाला नाही.

सध्या अनुष्का वर्ल्डकपचा आनंद घेताना दिसतेय. ती भारताच्या अनेक क्रिकेट सामन्यात विराटला चिअर करायला स्टेडियममध्ये बसलेली दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT