AP Dhillon Injury esakal
मनोरंजन

AP Dhillon Injury: 'माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा' प्रसिद्ध पंजाबी रॅपरला गंभीर दुखापत

ज्याच्या गायकीचे साऱ्या देशभर मोठे चाहते आहेत अशा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर एपी ढिल्लनला गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

AP Dhillon Suffered Injury: ज्याच्या गायकीचे साऱ्या देशभर मोठे चाहते आहेत अशा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर एपी ढिल्लनला गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिल्लननं त्याच्या इंस्टा स्टोरीवरुन आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. त्याची ही पोस्ट पाहताच नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात प्रसिद्ध रॅपर म्हणून एपी ढिल्लनचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याला इंस्टावर फॉलो कऱणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. युवावर्गात तर तो विशेष लोकप्रिय आहे. आगळी वेगळी स्टाईल, रॅपर म्हणून युवा वर्गाचा तो खास चेहरा आहे. त्याला गंभीर दुखापत झाल्यानं चाहत्यांच्या काळजात धस्स झालं आहे. देवाकडे प्रार्थना करण्याचे आवाहन त्यानं आपल्या पोस्टमधून केलं आहे.

AP Dhillon Injury

ढिल्लनचा तो रुग्णालयातील फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना कमालीचे वाईट वाटले आहे. त्यांनी त्याच्या आरोग्यासाठी देवाचा धावा सुरु केला आहे. रॅपर ढिल्लन हा जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात ढिल्लला नेमक्या कोणत्या कारणामुळे दुखापत झाली हे मात्र त्यानं सांगितलेलं नाही. त्यानं फक्त आपण एका संगीत सोहळ्यासाठी निघालो होतो तेव्हा आपल्याला अपघात झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एल ए मध्ये त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. तो आता रद्द करण्यात आला आहे.

ढिल्लननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कॅलिफोर्नियामधील माझ्या सर्व चाहत्यांना सांगताना मला वाईट वाटते आहे की, माझा अपघात झाला असून मला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याकारणास्तव नाईलजानं पूर्वनियोजित असा कॉन्सर्ट शो रद्द करावा लागत आहे. त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. ढिल्लनच्या बातमीनं मात्र नेटकऱ्यांना मोठा हादरा बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT