apurva nemlekar and kiran mane meets in satara after ravrambha movie promotion  sakal
मनोरंजन

Kiran Mane: मानाकी हमारी.. किरण मानेनं अपूर्वासाठी म्हंटला खास शेर.. तेही साताऱ्यात..

अपूर्वाच्या आगामी सिनेमा करिता ती साताऱ्यात गेली होती, तेव्हाचा हा भन्नाट व्हिडिओ..

नीलेश अडसूळ

apurva nemlekar and kiran mane : 'बिग बॉस मराठी ४'चं घर खऱ्या अर्थाने गाजवलं ते अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि अभिनेते किरण माने यांनी. किरण आणि अपूर्वा यांचे स्वभाव एकमेकाच्या अगदी विरुद्ध. बिग बॉसच्या सुरुवातीला या दोघांमध्ये चांगलेच वाद झाले.

मात्र एकमेकांचे कट्टर स्पर्धक आणि विरोधक असणारे किरण आणि अपूर्वा दोघेही टॉप तीन मध्ये होते. त्यांनी अत्यंत कसोशीने एकमेकांशी लढत दिली. पण बिग बॉसच्या घराबाहेर येताच ते एकमेकांचे मित्र झाले. आता तर त्यांच्यात अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

नुकतीच अपूर्वा आणि किरण आणि एकमेकांची भेट घेतली तेही साताऱ्यात.. सोबत एक खास व्हिडिओ पण तयार केला. यावेळी किरणने अपूर्वासाठी एक खास शेर अर्ज केला.

(apurva nemlekar and kiran mane meets in satara after ravrambha movie promotion )

अपूर्वा लवकरच 'रावरंभा' या ऐतिहासिक मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अपूर्वा त्याच्या प्रमोशनसाठी सगळीकडे भेट देत आहे. याच प्रमोशनसाठी अपूर्वा साताऱ्यात गेली होती.

आता साताऱ्यात गेली म्हणजे सातारचा बच्चन किरण मानेची भेट तर घ्यायलाच हवी. त्यामुळे अपूर्वा किरणला आवर्जून भेटली आणि सोबत दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडिओ मध्ये अपूर्वा म्हणते, 'हॅलो मि तुमची लाडकी अपूर्वा नेमळेकर.. माझ्या आगामी '‘रावरंभा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मी साताऱ्यात आले आहे. आता सातारा म्हंटल्यावर एक व्यक्तीला भेटायलाच हवं ते म्हणजे .. किरण्या.. ''

'त्यानंतर किरण माने व्हिडिओ मध्ये येतो सर्वांना नमस्कार करतो. त्यावेळी अपूर्वा म्हणजे किरण काय म्हणशील.. त्यावर किरण अपूर्वासाठी एक खास शेर अर्ज करतो. तो म्हणतो, 'माना की हमारी शख्सियत जुदा है.. पर इन हेजल आखों पण ये नट फिदा है.. '

यावेळी दोघेही हसतात आणि अपूर्वा म्हणजे पहा हा सातारचा बच्चन आणि किरण म्हणतो पहा ही दादारची शेरणी.. त्यांचा हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT