apurva nemlekar and vikas sawant fight video gose viral in Bigg Boss Marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मला हात लावू नकोस.. कानफाड फोडेन तुझं.. अपूर्वा-विकासमध्ये राडा..

विकासने दाखवलं खरं रूप, अपूर्वासोबत झाला मोठा वाद..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi : बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता साठ दिवसांचा टप्पा पार झाला आहे. घरामध्ये एकमेकांच्या विरोधात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक टास्क मध्ये आपल्याला चढाओढ दिसत आहे. पण या सगळ्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपूर्वा आणि विकास मध्ये चांगलीच गट्टी जमली होती. दोघेही एकत्र नाचले, बोलले अगदी त्यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचे भन्नाट मनोरंजन केले. पण ही नाते आता चांगलेच बिनसले आहे. अपूर्वा आणि विकास यांच्यात चांगलेच वाद झाले असून एकमेकांवर हात उगरण्यापर्यंत ही वाद टोकाला गेले आहेत.

(apurva nemlekar and vikas sawant fight video gose viral in Bigg Boss Marathi 4)

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून रविवारी रोहित शिंदेने एग्झिट घेतली. त्यानंतर बिग बॉसला या पर्वाचे टॉप १० फायनलिस्ट मिळाले आहेत. परंतु आता खरी गंमत येणार आहे. कारण दिवसेंदिवस खेळ अधिक कठीण होत जाणार आहे. अशातच अपूर्वा नेमळेकर व विकास सावंत यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आहे, या भांडणाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल हॉट आहे.

अपूर्वा विकासला ,म्हणाली, “मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आहे. कळत नाही का तुला”. त्यावर विकास म्हणतो, “मग माझं नाव कशाला घेतलं”. त्यावर अपूर्वाचा पारा चढतो. ती . म्हणते “चल रे निघ.. चल..” मग विकासचाही राग अनावर होऊ तोही अपूर्वाला “तू पण निघ. जाऊन बस तिथे”, असं म्हणतो. त्यानंतर त्यांच्यातील वाद वाढत जाऊन विकास अधिकच संतापतो आणि म्हणतो .. 'बोट खाली कर.. माझ्याशी बोट दाखवून बोलायचं नाही..'

ही करताना विकास अपूर्वाला हात लावतो, ते करता अपूर्वा विकासवर हात उगारत म्हणते, “माझ्या अंगाला हात लावायचा नाही.. कानफाड फोडेन तुझं”. त्यांच्यातील वाद इतका वाढतो कि सर्वजण त्या दोघांना अडवायला येतात. या भांडणाची सध्या भलतीच चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

Marathi Career Rashi Bhavishya: आजचा दिवस भाग्यवान! सूर्य–मंगळ संयोगामुळे 'या' राशींना मिळणार करिअर आणि आर्थिक फायदा

अग्रलेख - सरकारी माणिकशोभा!

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

SCROLL FOR NEXT