apurva nemlekar is winner of Bigg Boss Marathi 4 said actor madhav abhyankar sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: आज जिंकणार का शेवंता? पाहा काय म्हणाले अण्णा..

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर जिंकणार का, ती कशी खेळली याबाबत अभिनेते माधव अभ्यंकर यांनी महत्वाचे विधान केले आहे.

नीलेश अडसूळ

apurva nemlkar: शेवंता म्हणून ओळखली जाणारी अपूर्वा नेमळेकर म्हणजे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील वादळी व्यक्तिमत्त्व. आज 99 दिवसांचा टप्पा पूर्ण करून ती विजयाच्या दारात उभी आहे. या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. जे-जे आडवे आले त्या प्रत्येकाशी ती एकहाती भिडली. तिने केवळ राडाच घातला नाही तर प्रेम, माया, मनोरंजन सगळं काही दाखवलं. पण शेवंता जिंकणार का? यावर अण्णा नाईक यांनी खास प्रतिक्रिया 'सकाळ unplugged'' या पॉडकास्ट मध्ये दिली आहे.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने आजवर अनेक मालिका केल्या पण तिला खरी ओळख मिळाली ते झी मराठी वरील 'रात्रीस खेळ चाले'या मालिकेमुळे. या मालिकेत अपूर्वाने साकारलेल्या शेवंता या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. प्रेक्षक अपूर्वाच्या या भूमिकेसाठी अक्षरशः दिवाने होते. मालिकेतील शेवंता आणि अण्णा नाईक यांची जोडी प्रचंड गाजली. अण्णा नाईक म्हणजे अभिनेते माधव अभ्यंकर. अपूर्वाने मालिका सोडली तरी त्यांची मैत्री कायम राहिली. सध्या अपूर्वा विजयाच्या दारात उभी असतानाच माधव अभ्यंकर यांनी तिच्याविषयी सकळकडे एक महत्वाची बाब बोलून दाखवली आहे.

अपूर्वाने ही मालिका तडकाफडकी सोडली. त्यांनंतर अपूर्वाने निर्मात्यांवर काही आरोप केले. तसेच समोरूनही तिच्यावर आरोप झाले. आता बिग बॉस मराठीच्या घरात ती काहीशी अग्रेसिव्ह दिसली. बऱ्याचदा ती आवाज चढवून बोलताना दिसली. त्यामुळे ती उद्धट आहे असा अनेकांचा समज झाला आहे. पण खरच अपूर्वा अशी आहे का? तिच्यातलं नेमकं काय खटकतं आणि ती बिग बॉस मराठी चौथ्या पर्वाची विजेती होण्याच्या लायक आहे का? याविषयी त्यांनी अत्यंत महत्वाची टिपणी केली आहे.

ही सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर वर दिलेल्या पॉडकास्ट लिंक वर क्लिक करा आणि ही सविस्तर मुलाखत ऐका. अपूर्वा जिंकेल या याचं उत्तर तुम्हाला यातच मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसानंतर अपघात झाल्याचं आलं समोर

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरला! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

Latest Marathi News Update LIVE : शितल तेजवानी पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

SCROLL FOR NEXT