AR Rahman with son Ameen at the Grammy Awards 2022. Google
मनोरंजन

Grammy 2022: पुरस्कार सोहळ्याचा थाट दिसला ए.आर.रहमानच्या सेल्फीत,चाहते खूश

प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमाननं आपल्या मुलासोबत यंदा ६४ व्या ग्रामी पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.

प्रणाली मोरे

यंदाच्या ६४ वा ग्रामी पुरस्कार सोहळा(Grammy Awards 2022) लास वेगासच्या एमजीएम ग्रॅंड ग्रार्डनमध्ये रंगला. नेहमीच या सोहळ्याला ग्लॅमरस टच दिलेला पहायला मिळतो. यंदा अनेक हॉलीवूडकरांबरोबरच बॉलीवूडकरांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. बॉ़लीवूडचा दिग्गज संगीतकार ए.आर.रहमान(A.R.Rahman) यांनं आपल्या मुलासोबत या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. ए.अर.रहनाननं या सोहळ्याची काही क्षणचित्र त्याच्या ट्वीटर (twitter)अकाऊंटवर शेअर केली आहेत.

ए.आर.रहमाननं सोहळ्यासाठी खास पेहराव केला होता. त्यानं गोल्डन रंगाचा प्रिंटेड ब्लेझर परिधान केलेला दिसला. तर त्याचा मुलगा अमिननं कॅज्युअल शर्ट परिधान केला होता. सोशल मीडियावर रेहमानननं शेअर केलेल्या एका सेल्फीत सोहळ्याचा नजारा झकास दिसत आहे. रेहमानच्या चाहत्यांना मात्र त्याला ६४ व्या ग्रामी पुरस्कार सोहळ्यात पाहून भलताच आनंद झाला आहे.

यंदाच्या ग्रामी पुरस्कार सोहळ्यात ए.आर,रहमानसारख्या भारतीला काही दिग्गज संगीतकारांची उपस्थिती जिथे लक्ष वेधून गेली तिथे दुसरीकरडे गानसम्राज्ञी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली वाहण्यासा ग्रामी पुरस्कार सोहळ्याला विसर पडला याची देखील चर्चा झाली. 'द ग्रामी पुरस्कार' सोहळ्यात यंदा सिने-संगीत क्षेत्रातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली गेली. पण यात चक्क जागतिक पातळीवर सर्वपरिचित असलेल्या आणि सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मात्र वगळण्यात आलं. तर संगीतकार-गायक बप्पी लाहिरी यांचं देखील स्मरण करण्यात आलं नाही. ग्रामी पुरस्कार सोहळ्यात फक्त ब्रॉडवे संगीतकार स्टीफन सोंधेम,टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांना श्रद्धांजली वाहिली गेली. लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी या घटनेनंतर सोशल मीडियावर नाराजगी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी ग्रामी पुरस्कार सोहळ्याशी जोडलेल्या आयोजकांना थेट 'अज्ञानी' म्हणून संबोधलं आहे. चाहत्यांनी पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. ग्रामी पुरस्कार आयोजकांना लता मंगेशकर यांचा विसर पडावा हे त्यांचं अपयश आहे,असं देखील काही चाहत्यांनी म्हटलं आहे. तर काहींनी ग्रामीच्या सर्वसमावेशक आणि विविधता या एवढ्या वर्षांच्या परपंरेवरच बोट ठेवल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT