A.R.Rahman news  esakal
मनोरंजन

A.R.Rahman Birthday: कॅनडातील रस्त्याला 'ए.आर.रहमानचं' नाव! 'मोझार्ट ऑफ मद्रास' भावूक

ऑस्कर विजेता भारतीय संगीतकार ए आर रहमान यांचा आज वाढदिवस

युगंधर ताजणे

AR Rahman Birthday: ऑस्कर विजेता भारतीय संगीतकार ए आर रहमानचा वाढदिवस. काही दिवसांपुर्वी रहमानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. साऱ्या जगभर रहमान यांच्या संगीताचा चाहतावर्ग पसरला आहे. त्यानं आपल्या संगीतानं श्रोत्यांना वेड (entertainment news) लावलं आहे. मणिरत्नम यांच्या रोजा पासून सुरु झालेला त्याचा प्रवास अद्याप सुरु आहे. आपलं संगीत हे इतर संगीतकारांहून वेगळं असावं या ध्येयानं प्रेरित झालेल्या (bollywood musician) रहमान यांच्या संगीताचे चाहते अमाप आहेत. एखाद्या चित्रपटाला रहमानचं संगीत असतं तेव्हा प्रेक्षक आवर्जुन तो चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यास जातात. केवळ बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपटांना रहमाननं संगीत दिलं आहे.

आता तमाम भारतीयांसाठी गौरवास्पद असणारी बातमी म्हणजे रहमान याचं नाव देण्यात आलं आहे. मोझार्ट ऑफ मद्रास अशी ओळख असलेल्या रहमानच्या शिरपेचात यानिमित्तान आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या प्रथितयश संगीतकारानं भावूक होत कॅनडा सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी तो भावूक झाल्याचे दिसून आले आहे. संगीत क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या रहमानचा सन्मान करण्यासाठी कॅनडातील रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी देखील 2013 मध्ये परदेशातील एका शहरातील रस्त्य़ाला रहमान (अल्लाह रखा रहमान) यांचे नाव देण्यात आले होते.

रहमाननं सोशल मीडियावर ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यानं कॅनडाच्या महापौरांचा फोटोही शेयर केला आहे. त्यात त्याचे नाव देण्यात आल्याचे पत्रकही आहे. मार्खम शहर, फ्रँक स्कारपिट्टी आणि कॅनडामधील सर्व नागरिकांचा मी आभारी आहे. असं रहमाननं म्हटलं आहे. त्यानं ही पोस्ट शेयर करताच चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावरुन रहमानचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT