arbaz khan 
मनोरंजन

सुशांत प्रकरणात नाव घेतल्याने अरबाज खानने यूजर्स विरोधात दाखल केला मानहानीचा दावा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात कंगना रनौतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला जबाबदार ठरवलं होतं. इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीचा वाद सुरु झाल्यानंतर अनेक स्टारकिड्सवर निशाणा साधला जात होता आणि सोशल मिडियावर त्यांच्याविरोधात ललिहिलं जात होतं. आता या प्रकरणी अरबाज खानने स्वतःचं नाव आल्याने यूजर्सविरोधात मानहानिची केस दाखल केली आहे.

सोशल मिडियावर काही पोस्टमध्ये अरबाज खानला बदमान केल्याचा आरोप लावला गेला आहे. या पोस्ट्स मध्ये म्हटलं गेलंय की दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्युच्या कनेक्शनमध्ये अरबाज खानची देखील भूमिका आहे. यानंतर अरबाजने मुंबई दिवाणी न्यायालयात मानहानिची केस दाखल केली आहे. मुंबई दिवाणी न्यायालयाने २८ सप्टेंबरला विभोर आनंद आणि साक्षी भंडारी नावाच्या आरोपींविरोधात एक अंतरिम आदेश दिला आहे ज्यामध्ये या आरोपींना लगेचच ह्या बदनामी करणा-या पोस्ट्स काढून टाकण्याचे आदेश दिले गेले आहेत. 

सोशल मिडियावर शेअर केलेल्या या पोस्ट्समध्ये म्हटलं गेलं होतं की 'अरबाज खानला अटक केली गेली आहे. तसंच तपासासाठी त्याला सीबीआयने अनौपचारिकरित्या ताब्यात घेतलं आहे.' सुशांतचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या बांद्रा येथील घरी आढळून आला होता. तर त्याच्या काही दिवसांपूर्वीच ८ जूनला त्याची पूर्व मॅनेजर असलेल्या दिशा सालियनने आत्महत्या केली होती.   

arbaaz khan files for defamation after his name crops up in sushant singh rajput case  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT