Archana Gautam tirupati Balaji temple controversial video viral
Archana Gautam tirupati Balaji temple controversial video viral Google
मनोरंजन

'भारतातील हिंदू धार्मिक स्थळं...'; तिरुपती देवस्थानावर अभिनेत्रीचे गंभीर आरोप

प्रणाली मोरे

Archana Gautam Tirupati Balaji Video viral: 'ग्रेट ग्रॅंड मस्ती', 'हसीना पारकर', 'बारात कंपनी' सारख्या सिनेमात दिसलेली अर्चना गौतम सध्या सिल्व्हर स्क्रीनपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती भलतीच सक्रिय पहायला मिळते. आता सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे,ज्यात ती रागानं लालबूंद झालेली दिसत आहे. या व्हिडीओत ती तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या कर्माचाऱ्यांनी आपल्याला चुकीची वागणूक दिल्याचे आरोप करताना दिसत आहे. पण मंदीराच्या कर्मचाऱ्यांनी मात्र अभिनेत्रीचे आरोप धादांत खोटे असल्याचं म्हटलं आहे. उलट कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की अभिनेत्रीनंच आपल्यावर हल्ला केला होता.(Archana Gautam tirupati Balaji temple controversial video viral)

अर्चनाने ट्वीटर अकाऊंटवर ५ सप्टेंबर रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ती तक्रार करताना दिसत आहे. काही लोक तिला हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यापासून थांबवताना देखील दिसत आहेत. तर स्वतः अभिनेत्रीला त्या व्हिडीओत रडताना आणि जोरजोरानं ओरडताना देखील आपण पाहू शकतो. या व्हिडीओला अभिनेत्रीनं कॅप्शन देत लिहिलं आहे की, ''भारतातील हिंदूंची धार्मिक स्थळं आता लूटमारीचे अड्डे बनले आहेत. धर्माच्या नावावर तिरुपती बालाजी मंदिरात महिलांसोबत खूप चुकीचं घडत आहेत. येथील कर्मचाऱ्यांकडून ते घडत आहे,तेव्हा त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी आंध्रप्रदेश सरकारला हे निवेदन करतेय. तसंच,VIP दर्शनासाठी एकेका माणसाकडून १०५०० रुपये घेतले जातात. ही लूट बंद करा''.

व्हिडीओमध्ये अभिनेत्री फक्त हे म्हणताना दिसत आहे की,''मित्रांनो,मी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आली आहे,आणि मी तिकीटही घेतलं आहे. तेव्हा लगेचच कोणीतरी तिच्या हातातून फोन खेचून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तेव्हा अभिनेत्री जोरानं ओरडते,किंचाळते आणि त्या फोन खेचणाऱ्या व्यक्तीला शांत रहायला सांगते. पण रेकॉर्डिंग करणं ती बंद करत नाही. आणि अर्चना गौतम जोरजारोत रडताना दिसते. तिरुपती बालाजी मंदिरातल्या कर्मचाऱ्यांवर आपला रागही काढताना दिसतेय''.

त्यानंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर येऊन अभिनेत्री सांगताना दिसत आहे की, तिरुपती मंदिरात तिकीटाच्या नावावर १० हजार रुपये मागितले जातात. मी दर्शनासाठी तिकीट बूक केलं होतं.,पण जेव्हा मंदीरात पोहोचली तेव्हा येथील कर्मचाऱ्यांनी ते तिकीट स्विकारण्यास मनाई केली आणि माझ्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तिथल्या स्टाफनं अभिनेत्रीला हाकलून देण्याचा प्रयत्न केल्यावर तिनं थेट आंध्र सरकारला याविषयी निवेदन केलं. व्हीआयपी दर्शनाच्या नावावर सुरू असलेल्या लूटमारीचे धंदे बंद करायला लावा असं तिनं आपल्या निवेदनात म्हटलं.

तर तिरुपती बालाजी मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी दावा केले आहे की,अभिनेत्रीनंच आपल्यावर हल्ला केला. तसंच अभिनेत्रीनं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. अर्चना गौतम आणि तिच्यासोबत इतर ७ जणं उत्तरप्रदेशहून ३१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारचं शिफारस पत्र घेऊन दर्शनासाठी गेले होते. तिथे त्यांनी अॅडिशनल एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या कार्यालयात जाऊन दर्शन करण्यासाठी विनवणी केली होती. त्यानंतर ३०० रुपयांचे तिकीट अॅप्रूव्ह केलं गेलं होतं आणि तिवारी नामक व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर तसा मेसेज पाठवला गेला होता. पण तरीही अर्चना आणि इतर ७ जणं दर्शन करू शकले नाहीत कारण तोपर्यंत दर्शनाची वेळ निघून गेली होती.

आता तिरुपती बालाजी मंदिराच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की,अर्चना जबरदस्तीनं AEO ऑफिसरच्या कार्यालयात घुसली होती आणि अर्वाच्य भाषेत बोलायला लागली. जेव्हा तिला शांत राहण्यास सांगितले गेले तेव्हा तिनं कर्माचाऱ्यांना शिवीगाळ केली. तेव्हा तेथील स्टाफनं अर्चनाला पुन्हा ३०० रुपयाचं तिकीट दिलं पण तिनं ते स्विकारण्यास नकार दिला. ती त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास निघून गेली. त्यानंतर पोलिसांनी तिरुपतीच्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले. तिथे कर्मचाऱ्यांनी अर्चनाचा एक व्हिडीओ पोलिसांना दाखवला ज्यात अभिनेत्री चुकीचं वागत असल्याचं समोर आलं आहे.

तिरुपती मंदीराच्या कर्मचाऱ्यांनी १० हजार रुपयांविषयी देखील स्पष्टिकरण दिलं. ते म्हणाले, ''अर्चना यांना १ सप्टेंबरला १०,५०० रुपयांचे VIP तिकीट खरेदी करुन दर्शन घेण्याविषयी सूचित केले होते. पण अभिनेत्रीनं कर्मचाऱ्यांनी गैरप्रकारे १० हजार रुपयांची डिमांड केली असा चुकीचा आरोप व्हिडीओच्या माध्यमातून लावला होता''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : छत्रपती संभाजी नगरमधल्या मतदान केंद्रावर EVM मशीन बंद

China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

Latest Marathi News Live Update : मुंबई- गोवा महामार्गावर एक तासापासून वाहतूक कोंडी

Gautam Gambhir: 'KKR मध्ये सूर्यकुमारच्या क्षमतेचा योग्य वापर...', गौतम गंभीरने बोलून दाखवलं मनातलं दु:ख

Sandalwood Oil : उजळ त्वचेसाठी अन् सुरकुत्यांना घालवण्यासाठी चंदनाचे तेल आहे फायदेशीर, असा करा वापर

SCROLL FOR NEXT