Arijit Singh Angry of fan video viral traffic  esakal
मनोरंजन

Arijit Singh Video : अरिजितचा वाढला पारा, चाहत्याला रस्त्यावरच झापलं! नेमकं घडलं काय?

आता अरिजित सिंग हा त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Arijit Singh Angry of fan video viral traffic :

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये त्याच्या नावाचा चाहतावर्ग आहे.

आता अरिजित सिंग हा त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या एका चाहत्यानं सार्वजनिक ठिकाणी जे वर्तन केले त्यामुळे त्याचा संताप झाला असून त्यानं चाहत्याला भर रस्त्यातच सुनावले आहे. त्याच्या या व्हिडिओची जोरदार सुरुवात होत असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ कधीचा आहे याविषयी माहिती नाही. पण त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी अरिजितची बाजू घेतली आहे. बरं झालं अशा लोकांना याच प्रकारे समज देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यापूर्वी देखील अरिजितच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जे प्रसंग घडले त्याला गायकानं जशास तसे उत्तर देत चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. लोकप्रिय गायकासोबतच आपण परखड स्वभावाचे आहोत हेही त्यानं दाखवून दिले आहे.

त्या व्हिडिओमध्ये अरिजितनं संबंधित व्यक्तीला प्रेमात समजावून सांगितले. मात्र तो ऐकत नसल्याचे लक्षात येताच त्याला खडसावून त्याची चूक समजावून सांगितली. तो चाहत्यानं तब्बल आठ ते नऊ वेळा हॉर्न वाजवून अरिजितला त्रस्त केले होते. अऱिजितनं सदर बाब ही त्या व्यक्तीच्या निदर्शनास आणून दिली होती.

तू केवळ माझ्यासोबत फोटो मिळावा म्हणून हे सारं केलं. पण याचा बाकीच्या लोकांवर काय परिणाम होईल याचा विचार केला नाही. मी याला काय म्हणू, तुला कसा फोटो देऊ, अशा शब्दांत अरिजितनं त्याच्या भावना त्या व्यक्तीसमोर व्यक्त केल्या होत्या. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT