kamal hasan 
मनोरंजन

कोरोनाशी लढण्यासाठी कमल हासन यांनी दिली अशी प्रेरणा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच जणघरीच बसलेले आणि आपापली कामे घरच्या घरी करत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवा असणारे कर्मचारीच फक्त काम करताना दिसत आहेत. सरकार या संकटातून बाहेर पडण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. यातच संपूर्ण चित्रपटसृष्टी थंडावली आहे. मालिका आणिचित्रपटांचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. सतत चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेले हे कलाकार देखील घरात बसले आहेत. सगळेच कलाकार या क्वारंटाईनदिवसात नवनवीन गोष्टी करताना दिसत आहेत. कोरोना विषाणूबाबत जनतेमध्ये जागरूकता आणि आवाहन करण्यासाठी बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार गाणी तयार करत आहेत.ही गाणी प्रत्येकाने घरातूनच सोशल डिस्टंसिंग पाळत चित्रीत केले आहेत.

या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. सध्या सुरु असणाऱ्या निराशाजनक वातावरणात प्रोत्साहन देण्यासाठी आता अभिनेते कमल हासन देखील एक गाणं घेऊन आले आहेत. ‘अरीवम अनबम’ असं या गाण्याचे नाव आहे. हे गाणं तमिळ भाषेत आहे. हे गाण्यातून देशवासीयांना कोरोना विरोधात लढण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. कमल हासन यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे आणि कमल हासन यांनीच हे गाणं लिहिलेही आहे.

संगीतकार शंकर महादेवन, बॉम्बे जयश्री, युवान शंकरराजा, अनिरूद्ध रविचंदर, अभिनेता सिद्धार्थ, एंड्रिया, देवी श्रीप्रसाद, बिग बॉस फेममुगेन राव, सिड श्रीराम आणि श्रुती हासन या कलाकारांनी या गाण्याला आवाज दिला आहे. हे गाणं झूम व्हिडिओ कॉलद्वारे प्रदर्शित करण्यात आलेआहे. या गाण्यातून सध्याच्या निराशाजनक वातावरणात लोकांना आशेचा किरण दाखवला आहे.या गाण्याची संकल्पना कमल हासन यांचीच असून त्यांनी हे गाणं अवघ्या तीन तासांत लिहिले आहे.कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी कलाकार मंडळी नवनवीन गाणी तसेच लघुपट तयार करत आहेत. तसेच त्यांचा हा प्रयत्न यशस्वीही होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samarjeet Ghatge: समरजीत घाटगे पुन्हा भाजपमध्ये जाणार? तारीखही आली; घरवापसीचं नेमकं कारण काय?

GT vs RR Live : गुजरात टायटन्सचे नेतृत्व राशीद खान याच्याकडे; शुभमन गिल याला नेमकं काय झालं? IPL 2026 मध्ये मोठा ट्विस्ट

सीईटी परीक्षेत संतापजनक प्रकार, पेपरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, कारवाईची मागणी

Horoscope News : 'या' तारखेपासून शनीदेव बदलणार 5 राशींचं नशीब ! शंकराची होणार कृपा, भाग्योदयाची सुरुवात

Ajit Pawar legacy: बारामतीत जय पवारांचा भावनिक संवाद; अजितदादांच्या आठवणींनी कार्यकर्ते अश्रूनयन, सुनेत्रा पवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT