arjun kapoor,malaika arora file image
मनोरंजन

मलायकासोबत काम करशील? ; अर्जुनचं सडेतोड उत्तर

अर्जुन आणि मलायका अरोराच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. अर्जुन आणि मलायका अरोराच्या (malaika arora) नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. परंतु त्यांच्या नात्याविषयी अर्जुन आणि मलायकाने कोणतेच वक्तव्य केले नाही. अनेक वेळा ते एकत्र फिरताना दिसतात. तसेच एकमेकांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर दोघेही शेअर करत असतात. नुकताच एका मुलाखतीमध्ये अर्जुनला 'तुला खऱ्या आयुष्यातील पार्टनरसोबत एखाद्या प्रोजक्टवर काम करायला आवडेल का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला अर्जुनने दिलेल्या उत्तरने अनेकांचे लक्ष वेधले.(arjun kapoor and malaika arora work together on same project)

मुलाखतीमध्ये अर्जुन म्हणाला 'आयुष्यात कधीही नाही म्हणू नका. मी यावर कधी विचार केलेला नाही. असं काही माझ्या डोक्यातही कधी आलं नाही.'अर्जुनच्या उत्तरावरून त्याचे चाहते असा अंदाज लावत आहेत की जर मलायका आणि अर्जुनला एकत्र काम करण्याची संधी मिळाली तर ऑनस्क्रीनही एकत्र दिसू शकतात. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या अफेअरची चर्चा सुरू होती. मलायका आणि अर्जुनने 2019 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अर्जुन अनेक वेळा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतो.

काही दिवसांपुर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्जुनचे 'सरदार का ग्रँडसन' आणि 'संदीप और पिंकी फरार' हे चित्रपट प्रदर्शित झाले. लवकरच तो मोहित सूरी यांच्या एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटातही तो दिसणार आहे. ज्यात दिशा पाटनी, तारा सुतारीया आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT