Arjun Kapoor On Sex And Multiple Partners Instagram
मनोरंजन

Arjun Kapoor On Sex: 'लग्नाआधी इंटिमेट होणं किती योग्य?',अर्जुन कपूरनं दिलं कडक उत्तर

'निषेध 2' या वेब सिरीजच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित कार्यक्रमात अर्जुन कपूरनं सेक्स आणि रिलेशनशीप यावर बेधडक वक्तव्य केली आहेत.

प्रणाली मोरे

Arjun Kapoor:बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर एमटीव्हीची वेब सिरीज 'निषेध 2' च्या प्रमोशन्समध्ये सध्या खूपच व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अर्जुन कपूरनं मीडियासोबत बातचीत केली आहे. यादरम्यान त्यानं गर्भपात,ट्यूबरक्लोसिस,सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिज अशा अनेक विविध गोष्टींवर मोकळेपणानं भाष्य केलं. यावेळी एका पत्रकारानं त्याला थेट सवाल केला की लग्नाआधी सेक्स आणि एकाहून अधिक लोकांनी संबंध ठेवणं किती योग्य आहे ?(Arjun Kapoor Befitting reply to reporter asking about sex and partners)

पत्रकारानं अर्जुनला प्रश्न विचारला होता की, आपल्या देशाची ओळख म्हणजे आपली संस्कृती,जिथे लग्नाआधा कोणीच सेक्स करत नाही. लग्नाआधी किंवा लग्नानंतर एकापेक्षा अधिक पार्टनरसोबत सेक्स करणं यावर तुझं मत काय आहे? भारताची संस्कृती आपल्याला एक पतीव्रता तसंच एका पत्नीशी एकनिष्ठ असणं याचं महत्त्व कायम सांगत आली आहे. आपला जन्म एकदाच होतो,मृत्यूही एकदाच,या आयुष्यात आपण लग्न देखील एकदाच करतो. याविषयी तुझं मत काय आहे.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

लग्नाआधी सेक्स करणं याविषयी स्पष्ट शब्दात बोलताना अर्जुन म्हणाला,''ही ओळख कोणी बनवली?'', तेव्हा मध्येच पत्रकार मजेत म्हणाला,'शाहरुख खानने'. यावर अर्जुन कपूर म्हणाला, ''शाहरुख खान भारताची ओळख नाही''. यावेळी अर्जुनच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईलही होतं. पत्रकाराचं म्हणणं पडलं की शाहरुखनेच अशी भारताची ओळख आपल्या सिनेमातून करून दिलीय. अर्जुन मात्र याच्याशी सहमत व्हायला तयार नव्हता. आणि म्हणाला,''शाहरुखनं असं काहीही स्वतःहू म्हटलेलं नाही''.

त्यानंतर पत्रकाराच्या प्रश्नाला कडक शब्दात उत्तर देताना अर्जुन म्हणाला, ''एका माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. आपण अनेक जणांना आपल्या आयुष्यात भेटतो. अनेक नाती जोडतो. जेव्हा तुम्ही लग्नाचा निर्णय घेता,तेव्हा ती खूप मोठी गोष्ट असते. आणि त्याहून मोठी गोष्ट असते ती कोणाशीतरी रिलेशनशीपमध्ये असणं. लग्नापर्यंत पोहोचण्यासाठी देखील खूप टप्प्यांना पार करावं लागतं. तुम्ही तुमच्या आयुष्यात कुणाला पहिल्यांदा भेटाल तेव्हाच नाही ठरवू शकत की तुम्ही त्याच्याशी लग्न करणार आहात''.

''तुम्हाला कसं कळेल कुणी व्यक्ती भेटता क्षणीच ती तुमच्यासाठी योग्य आहे. १८-२० वर्षाच्या वयात प्रेम काय हे कुठे कळत असतं. कितीतरी वेळा कदाचित तुमच्या मनात येत असेल की हेच आपलं खरं प्रेम. कारण खूप गोष्टी असतात ज्या वर्कआऊट नाही होत. मला विचारलं गेलं एकाहून अधिक पार्टनर सोबत रिलेशनमध्ये असण्याविषयी. अरे हे आयुष्य आहे,व्हिडीओ गेम नाही. मला वाटत की तुम्ही प्रश्न बदलायला हवा,कारण याचं उत्तर खूप लॉजिकल आहे''.

अर्जुनच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर अर्जुन कपूर लवकरच 'कुत्ते' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आसमान भारद्वाज करणार आहे. याव्यतिरिक्त अर्जुन कपूरकडे 'द लेडी किलर' आणि 'मेरी पत्नी' सिनेमाचे रीमेक देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT