arjun kapoor birthday sakal
मनोरंजन

१२ वर्ष मोठी, पदरी मुल तरीही अर्जुन कपूरचा मलायकासाठी का तुटतो जीव, वाचाच

अर्जुन कपूर मलायका आरोराची ही खास लव्हस्टोरी ..

नीलेश अडसूळ

Arjun kapoor birthday : अभिनेता अर्जुन कपुर आजपर्यंत अनेक चित्रपटातून आपल्या भेटीला आला. त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिस वर फारसे कमाई करू शकले नाहीत परंतु अर्जुन मात्र प्रेक्षकांच्या मनात कायमच हीट राहिला आहे. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. सध्या तो त्याच्या कामापेक्षा त्यांच्या प्रेम संबंधांमुळेच अधिक चर्चेत आहे. अर्जुन का गेली काही वर्षे आपल्यापेक्षा वयाने १२ वर्षे मोठ्या असलेल्या मलायका अरोरा हिच्या प्रेमात आहे. त्यांना अनेकदा ट्रॉल देखील केलं गेलं. पण अर्जुन मात्र या प्रेमावर ठाम आहे. आज अर्जुनचा ३७ वा वाढदिवस, त्या निमित्ताने दोघांच्या नात्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न.. (happy birthday arjun kapoor) (arjun kapoor and malaika arora lovestory)


अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांना त्यांच्या वयातील अंतरावरून अनेकदा ट्रोल केलं गेलंय. अर्जुनने वारंवार या ट्रोलिंगवर उत्तर दिलं आहे. दोघेही त्यांच्या प्रेमाबद्दल पूर्णपणे ठाम आहेत. मलायका ही सलमान खानचा मोठा भाऊ अरबाज खान याची बायको. मलायका आणि अरबाज २०१७ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर अर्जुन आणि मलायका यांची लव्हस्टोरी सुरू झाली. 2019 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. "वयातील अंतरावरून नात्याला दोष देणं हा निव्वळ मूर्खपणा आहे", असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितले होते.

एका मुलाखतीत अर्जुनला विचारण्यात आले होते की, 'तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तसेच घटस्फोट झालेल्या आणि एका मुलाची आई असलेल्या मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये येताना तू काय विचार केला होतास?' या प्रश्नाला अर्जुनने उत्तर दिले की, ' आम्ही दोघेही आमच्या नात्याचा आदर करतो. पण आमच्या नात्यात काही मर्यादाही आहेत. तिला जे आवडते ते ती करते आणि तेच मीही करतो. आमच्या नात्याने आमच्या करियरवर कधीच परिणाम होणार नाही. आम्ही एकमेकांना पुरेसा वेळही देतो आणि एकमेकांची स्पेसही जपतो,' असे उत्तर अर्जुनने दिले होते.

मलायका आणि अर्जुन लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असून मुंबईतच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हे जोडपं लग्न करणार आहे. या लग्नाला केवळ दोघांच्या कुटूंबातील व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे लवकरच ही अनोखी प्रेमकहाणी लग्नात रूपांतरित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT