Arjun Kapoor and Malaika Arora Sakal
मनोरंजन

Arjun Kapoor: मलायकाच्या 'तेरा की ख्याल' गाण्याने अर्जुन कपूरलाही लावले वेड, गर्लफ्रेंडचे कौतुक करत म्हणाला...

अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मलायका अरोरा आणि गुरु रंधावाला 'तेरा की ख्याल' गाण्यासाठी सपोर्ट करत एक स्टोरी पोस्ट केली आहे.

Aishwarya Musale

मलायका अरोरा आणि गुरु रंधावा यांचे 'तेरा की ख्याल' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अभिनेत्री तिच्या डान्स आणि किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकत आहे. मलायकाची गुरुसोबतची केमिस्ट्रीही या गाण्यात अप्रतिम आहे.

'तेरा की ख्याल' या गाण्याचे चाहत्यांकडून कौतुक होत असताना, खुद्द अर्जुन कपूरही त्याचे कौतुक करणे थांबवू शकला नाही आणि या गाण्यात नाचताना दिसणारी त्याची लेडी लव्ह मलायकाचे त्याने कौतुक केले आहे.

या गाण्यासाठी मलायका अरोरा आणि गुरु रंधावाला सपोर्ट करत अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये 'या गाण्यावर प्रेम करा' असे लिहिले आणि तिला टॅग केले. तेरा की ख्याल या गाण्यात गुरु रंधावाने आपला आवाज दिला आहे. रॉयल मान यांनी हे गाणे लिहिले आहे. बॉलिवूड कोरिओग्राफर बॉस्को लेस्ली मार्टिस यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

मलायका असो की अर्जुन, दोघेही एकमेकांच्या कामाला प्रोत्साहन देतात, सोशल मीडियापासून सार्वजनिक ठिकाणी दोघेही एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. मलायका आणि अर्जुन आता उघडपणे एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

अलीकडेच मलायकाने एका मुलाखतीदरम्यान अर्जुन कपूरचे कौतुक केले होते आणि त्याला एक चांगला साथीदार असल्याचे सांगितले होते. NMACC लाँच इव्हेंटच्या रेड कार्पेटवर दोघेही सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसले. त्यांच्या जोडीने येथे सर्वांची मने जिंकली.

Arjun Kapoor

मलायका अरोराचे पहिले लग्न अरबाज खानसोबत झाले होते. दोघांनी 1998 मध्ये लग्नगाठ बांधली पण 18 वर्षांनंतर मार्च 2016 मध्ये ते वेगळे झाले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर मलायका अरोरा अलीकडेच तिच्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.

त्याचवेळी अर्जुन कपूरचा 'कुत्ते' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर तो भूमी पेडणेकरसोबत 'द लेडी किलर' आणि भूमी आणि रकुल प्रीत सिंगसोबत 'मेरी पत्नी'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT