Arjun Kapoor to not get married to Malaika Arora anytime soon. Here is why Google
मनोरंजन

Malaika सोबत लग्न करण्यास तयार नाही अर्जुन, अभिनेता पहिल्यांदा स्पष्ट बोलला

कॉफी विथ करण 7 च्या आगामी भागात अर्जुन कपूरनं आपल्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात अनेक मोठे खुलासे केले आहे.

प्रणाली मोरे

Arjun kapoor on Marraige With Malaika Arora: करण जोहरचा 'कॉफी विथ करण 7' शो सध्या सेक्स लाईफवरील त्याच्या प्रश्नांमुळे खूपच चर्चेत आला आहे. या शो मध्ये जिथे एका बाजूला सेलिब्रिटींच्या आयुष्यातील मोठे खुलासे आपल्याला हैराण करुन सोडत आहेत तिथे दुसरीकडे या सेलिब्रिटींचे चाहते त्यांच्याशी संबंधित गॉसिप्सवर नजर ठेवून आहेत. नुकताच या शो मध्ये अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. जे ऐकण्यासाठी अर्जुनचे चाहते मात्र भलतेच उत्सुक आहेत. आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की अर्जुन कपूर मलायका अरोराला डेट करत आहे,अर्थात त्यांच्यातील नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. करणच्या शो मध्ये अर्जुनने अभिनेत्रीशी संबंधित काही प्रश्नांनावर थेट उत्तरं दिली आहेत.(Arjun Kapoor to not get married to Malaika Arora anytime soon. Here is why)

अर्जुन कपूर आणि मलायका अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केले जातात. अर्जुनने करण जोहरच्या चॅट शो मध्ये मलायका आणि आपल्या नात्यासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. अर्जुन कपूरसोबत त्याची बहिण सोनम कपूर देखील शो मध्ये पोहोचली होती. यादरम्यान करणने अर्जुनला मलायका सोबत असलेल्या त्याच्या नात्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले. अर्जुनने त्यावेळी उत्तर देताना आपल्या लग्नाच्या प्लॅनविषयी देखील मोठा खुलासा केला आहे.

करण जोहरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन कपूर म्हणाला आहे की, ''मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. तसंच,मला माझ्या आयुष्यात स्थिर व्हायचं आहे,व्यावसायिक पातळीवर आणि वैयक्तिर पातळीवरही. मला आयुष्यात काम करत राहायचं आहे,कारण त्यामुळे मला आंतरिक आनंद मिळेल आणि मी माझ्या जोडीदाराला पण खूश ठेवू शकेन''.

लग्नासंदर्भात अर्जुन कपूरच्या या उत्तरावर त्याचे चाहते मात्र काही खास खूश दिसत नाहीत. कारण चाहत्यांना आपल्या या लाडक्या कलाकारांच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यात इंट्रेस्ट आहे. करण जोहरनं अर्जुनला लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नावर चाहत्यांना वेगळंच उत्तर अपेक्षित होतं पण अर्जुननं मात्र लग्नाचा विषय टाळल्याचं स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT