मनोरंजन

अर्जुन रामपालच्या मेव्हण्याला अटक : ड्रग्ज प्रकरण

युगंधर ताजणे

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपालबाबत (arjun rampal) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड्च्या भावाला गोव्यात अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकारणाचा जेव्हा तपास सुरु होता तेव्हा ड्रग्ज प्रकरणात अनेक सेलिब्रेटींची नावं समोर आली होती. गॅब्रियला असे अर्जुनच्या गर्लफ्रेंडचे नाव असून तिचा भाऊ ऍगीसिलोस डेमेट्रीयड्सला गोव्यातून अटक करण्यात आली आहे

मुळचा दक्षिण आफ्रिकन नागरिक असलेल्या ऍगीसिलोस डेमेट्रीयड्स यांच्याकडून हॅश आणि अल्प्राजोलम हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यासगळ्या प्रकरणात अर्जुनचीही डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वी ऍगीसिलोस डेमेट्रीयड्स ला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या कारणास्तव अर्जुनची अंमली पदार्थ विरोधी विभागानं चौकशीही केली होती त्याला मुंबई सेशन कोर्टानं 15 डिसेंबरला जामीन दिला होता . त्यावेळी त्याच्या कडून ट्रामाडॉल हे अंमली पदार्थ जप्त केले होते या ड्रग्जवर भारतात बंदी आहे. आरोग्याच्या कारणास्तव ते काही औषधांमध्ये वापरले जाते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणाविषयी अधिक माहिती देताना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, ग्रॅबिएलचा भाऊ हा ड्रग्जच्या सप्लायमध्ये अॅक्टिव्ह होता. त्याच्यावर पाळतही ठेवण्यात आली होती. त्यातही तो अनेकदा सापडला होता.

याशिवाय ऍगीसिलोस डेमेट्रीयड्सला काही ड्रग्ज पेडलरच्याही संपर्कात होता. अशीही माहिती पोलिसांना मिळाली होती. वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, ऍगीसिलोस डेमेट्रीयड्सला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. एनसीबीनं या कारवाईतून नऊ कोटी रुपये जप्त केल्याची माहिती आहे. त्या कारवाईमध्ये कोकीन, पीसीबी आणि एमडी सारखे पदार्थ सापडले होते. याप्रकरणात ग्रॅबियलसोबत अर्जुन रामपालच्या बहिणीचीही चौकशी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT