aroh welankar comment on eknath shinde and shiv sena in sakal unplugged podcast  sakal
मनोरंजन

Eknath shinde: सेनेनं शिंदेंना मोठं केलं पण.. आरोह वेलणकरची शिवसेनेवर टीका

सकाळ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत आरोहने सेनेवर निशाणा साधला.

नीलेश अडसूळ

eknath shinde : महाराष्ट्रात सध्या काय राजकीय स्थिती आहे हे आपण पाहतोच आहोत. एक वेगळेच राजकीय नाट्य महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये सुरू आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर आता शिवसैनिकाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यात शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बंडखोरांना आपल्या भाषणातून सुनावले. ज्यांना आम्ही मोठं केलं ते आता आम्हालाच घराबाहेर काढत आहेत अशी भूमिका शिवसेनेची आहे. यावर अभिनेता आरोह वेलणकर याने महत्वाचे भाष्य केले आहे. (sakal unplugged) (aroh welankar comment on eknath shinde and shivsena in sakal unplugged podcast) (aroh welankar on eknath shinde)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांची वाट पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत परंतु एकनाथ यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. आता पर्यंत 40 हूंन अधिक आमदारांचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे. काही खासदारही त्यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूणच राजकीय स्थिती पूर्णतः ढवळून निघाली आहे. शिंदे यांनी बंडाच्या भूमिकेमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या भूमिकेवर आता शिवसैनिक आक्रमक भूमिका घेऊ लागले आहेत. ज्यांना शिवसेनेने मोठं केलं, पदं दिली ते आता शिवसेनेवरच शिरजोरी करत आहेत असा सुर उमटत आहे. पण आरोहने (Aroh velankar) मात्र हे विचार खोडून टाकले आहेत. त्याने सकाळ ऑनलाइनच्या 'सकाळ unplugged' या विशेष कार्यक्रमात आपले विचार मांडले.

'शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं वारंवार बोललं जात आहे. मग एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केले आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांनीही सेनेला भरभरून दिले आहे.' असे आरोह म्हणाला. याशिवाय महाविकास आघाडी, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार, सेनेच्या चुका, अनैसर्गिक युती यावरही त्याने सडकून टिका केली. पण ते ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. अत्यंत महत्वाच्या विषयांवर आरोहने प्रकाश टाकला आहे. तेव्हा खाली दिलेले पॉडकास्ट नक्की ऐका..

अभिनेता आरोह वेलणकर हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. शिवाय राजकीय विश्वावरही तो भाष्य करताना दिसतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तो बराच सक्रिय असतो. त्याचा पाठिंबा उघडपणे भाजप पक्षाला असल्याचे वारंवार दिसले आहे. तो केंद्र सरकारच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करत असतो. त्यात गेली काही दिवस महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर त्याने सकाळ पाॅडकास्ट मध्ये भाष्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT