Arpita Khan Eid Party Esakal
मनोरंजन

Arpita Khan Eid Party: भाईजानच्या बहिणीच्या ईद पार्टीत अवतरले बॉलिवूडमधले तारे...व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

बॉलिवूड सेलिब्रिटींनी आदल्या दिवशी ईदचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. प्रत्येकाने आपापल्या शैलीत चाहत्यांचे अभिनंदन केले. संध्याकाळी सलमान खान त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना दिल्या.

बॉलीवूड स्टार सलमान खानची ईद पार्टी खुपच लोकप्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण यावेळी भाईजान ऐवजी त्याची बहीण अर्पिता खान शर्मा आणि मेव्हणा आयुष शर्मा ईद पार्टी दिली. ज्यात अनेक बी-टाउनमधील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. अर्पिता खानने संध्याकाळी ईद पार्टीचे आयोजन केले. या पार्टीत अनेक सेलेब्स त्यांच्या लूकमध्ये पोहोचले होते. सगळ्यांचे लूक आश्चर्यचकित करणारे होते.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा आणि तिचा पती आयुष शर्मा या जोडप्याने 2014 मध्ये लग्न केले आणि त्यांना आयत आणि अहिल ही दोन मुले आहेत.

त्यांच्या ईद पार्टीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे आणि प्रसिद्ध चेहरे आले होते. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी, कतरिना कैफ, एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी, नेहा शर्मा, तब्बू, एमसी स्टॅनसह अनेक स्टार्स पोहोचले.

'आश्रम' फेम बॉबी देओल या स्टाईलमध्ये दिसला.अर्पिता खानच्या ईद पार्टीत सुशीला चरक आणि हेलन पोहोचल्या.ईद पार्टीत सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीही दिसली होती. सलमान खानही बहीण अर्पिताच्या ईद पार्टीला कडक सुरक्षा व्यवस्थेत पोहोचला. या दोन स्टार्सशिवाय हुमा कुरेशीही अर्पिता खान शर्माच्या घरी पोहोचली.

हुमाचा ड्रेस इंडो स्टाइलचा आहे. अभिनेत्रीने धोती स्टाईल स्कर्ट घातला आहे, सोबत एक लहान खोल गळ्याची चोली आणि तिच्या खांद्यावर दुपट्टा घातला आहे.या पार्टीत कंगणा राणौत आणि कतरिनाची यादोघींची बरिच चर्चा रंगली.


या स्टार्सशिवाय अर्पिता आणि सलमान खानची बहीण अलविरा पती अतुल अग्निहोत्रीसह ईद पार्टीत आली होती. अल्विरा गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसली आणि कॅमेरा पाहताच तिने जबरदस्त पोझ दिली. या पार्टीत सलमान खान नसला तरी त्याचा बॉडीगार्ड शेरा नक्कीच दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक

Latest Maharashtra News Updates Live: सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाना विरोधात रस्ता रोको

हळदीकुंकवात करंडे- फण्या देऊन कंटाळलात? डीमार्टमध्ये १५ रुपयापासून मिळतायत भन्नाट ऑप्शन; वाचा यादी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रकल्पांना भूसंपादनाचे ग्रहण; शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन चिंतेत

SCROLL FOR NEXT