Ekta kapoor esakal
मनोरंजन

एकता कपूर आणि आई शोभा कपूरला होणार अटक... वॉरंट जारी

वेबसीरीज बनवणं आलय अंगलट...अडचणी वाढल्या

सकाळ डिजिटल टीम

टेलिव्हिजन ड्रामा आणि एकता कपूर हे गमक सर्वश्रुत आहे.तिचे अनेक शो टीआरपीचे रेकॅार्ड तोडतात. मात्र एक वेबसीरीज करणं तिला महाग पडल्याचं दिसतय.एकता कपूर आणि आई शोभा कपूर या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलय. बिहार न्यायालयाने हे अटक वॉरंट जारी केलं आहे. xxx ही वेबसीरीज बनवणं तिच्या अंगलट आलय.आता बिहारच्या बेगुसरायमध्ये या वेबसीरीज विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.या तक्रारीनंतर आता दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

xxx या वेब सीरिजमध्ये सीमेवर तैनात राहून सुरक्षा प्रदान करणाऱ्या सैनिकाची पत्नी सैनिकाच्या गणवेशात इतर लोकांशी शारीरिक संबंध करते असे दाखविण्यात आले होते. संपूर्ण देश सैनिकाच्या गणवेशापुढे नतमस्तक होतो.लष्कराचा अपमान मानून देशाचं रक्षण करणारे भारतीय सैनिक ज्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आज सुरक्षित आहे. या वेबसीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीबाबत काही अत्यंत चुकीचे सीन दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

वेबसीरिज कंपनीच्या निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी ही निकृष्ट वेबसीरिज एका वेब पोर्टलवर टाकली होती. ज्यामध्ये भारतीय सैनिकांचा अपमान करण्यात आला असल्याचे बेगुसरायचे वकील हृषिकेश पाठक यांनी सांगितले. तमिला अहवालाची पुष्टी करताना या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. हे प्रकरण राजीव कुमार यांच्या कोर्टातून विकास कुमार यांच्या कोर्टात हस्तांतरित झाला आणि तेथूनच हे अटक वॉरंट जारी झालय.

दरम्यान ,वाद वाढल्यानंतर एकता कपूरने आपली चूक मान्य करत वेब सीरिजमधून हा सीन लगेच काढून टाकला होता. एकता कपूरने याबद्दल लोकांची माफीही मागितली आहे. असे असतानाही या वेबसिरीजबाबत देशाच्या अनेक भागांत विरोध होत आहे.अखेर या दोघींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं असून तिला अटक होणार का?तिची भुमिका काय असेल? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT