Arshad Warsi Jolly LLB 3 With Akshay Kumar Bollywood  esakal
मनोरंजन

Jolly LLB 3 येणार, अर्शद वारसीनं दिली गुड न्यूज! केव्हा होणार प्रदर्शित?

काही दिवसांपूर्वी अर्शद वारसीची असूर ही मालिका ओटीटीवर प्रदर्शित झाली. बऱ्याच वर्षांपासून नेटकरी, प्रेक्षक त्याच्या या मालिकेची आतूरतेनं वाट पाहत होते.

युगंधर ताजणे

Arshad Warsi Confirms Jolly LLB 3 with Akshay Kumar Film : अर्शद वारसी काय क्षमतेचा कलाकार आहे हे ज्यांनी त्याचा जॉनी एलएलबी पाहिला असेल त्यांना त्याची कल्पना येईल. यापूर्वी अर्शदनं मुन्नाभाई एमबीबीएस, इश्किया, सारख्या चित्रपटांमधून आपणही कुणापेक्षा कमी नाही हे दाखवून दिले होते. त्यानंतर आता तो पुन्हा त्याच्या जॉनी एलएलबी ३ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी अर्शद वारसीची असूर ही मालिका ओटीटीवर प्रदर्शित झाली. बऱ्याच वर्षांपासून नेटकरी, प्रेक्षक त्याच्या या मालिकेची आतूरतेनं वाट पाहत होते. अखेर त्या मालिकेचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आणि अर्शद वारसी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या मालिकेमध्ये त्यानं धनंजय राजपूत नावाच्या अधिकाऱ्याची भूमिका केली आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

आता अर्शद वारसी हा त्याच्या जॉनी एलएलबी ३ मुळे सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्याची तुफान चर्चाही झाली होती. विनोदी ढंगानं समाजातील अनिष्ट गोष्टींवर प्रभावीपणे भाष्य केले होते. अनेकांनी या चित्रपटाचे कौतूक केले होते.

अक्षय कुमार, सौरभ शुक्ला आणि अर्शद वारसी सारख्या कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यात सर्वाधिक भाव खाऊन गेला होता तो अर्शद वारसी. त्यानं वकिलाची रंगवलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली. त्यानंतर त्याच्या त्या भूमिकेचे खूपच कौतूक झाले. अनेकांनी त्याला शाबासकीही दिली. आता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही जॉनी एलएलबीच्या तिसऱ्या भागामध्ये एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे.

यावर अर्शद वारसीनं देखील माहिती दिली आहे. त्यानं आपण अक्षय सोबत तिसऱ्या पार्टमध्ये काम करणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाचे शुटींग सुरु असल्याची माहिती आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यानं सांगितलं की, येत्या काळात मुन्नाभाई एमबीबीएस ३ च्या चित्रपटाचा विचार सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT