Arshad Warsi  Instagram
मनोरंजन

बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण करणारा 'सर्किट' कामाच्या शोधात

"ती वेळ कधीतरी माझ्यावरही येईल याची भीती"

स्वाती वेमूल

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता अर्शद वारसीने Arshad Warsi इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण केली आहे. १९९३ मध्ये 'रुप की रानी चोरों का राजा' या चित्रपटातील एका गाण्यासाठी कोरिओग्राफर म्हणून काम केल्यानंतर अर्शदने १९९६ मध्ये 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमधील त्याचा हा प्रवास अनेक चढउतारांचा होता. "या इंडस्ट्रीत मी २५ वर्षे टिकून राहू शकेन असं मला वाटलं नव्हतं. माझ्यासोबत पदार्पण करणारे अनेक कलाकार आता कुठेच पहायला मिळत नाहीत. कधीतरी माझ्यावरही अशीच वेळ येईल अशी भीती मला वाटायची", असं अर्शद नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती म्हणाला.

बॉलिवूडच्या या प्रवासाबद्दल तो पुढे म्हणाला, "अभिनेता म्हणून पदार्पण करण्याची मला खूप भीती त्यावेळी वाटत होती, कारण मी कधीच अभिनय केलं नव्हतं. अपयशाची मला खूप भीती होती, म्हणून मी चित्रपटांपासून लांब पळायचा प्रयत्न करत होतो. वाईट काळापासून ते न थांबता काम करेपर्यंत मी इथं प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. खरंतर, मी इंडस्ट्रीत २५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि तरीसुद्धा आता मी कामाच्या शोधात आहे. माझ्या मते ही इंडस्ट्री अशीच आहे."

"आयुष्यातील यश आणि अपयशाला मी फार गंभीरपणे घेत नाही. त्याचप्रमाणे मी अगदी सहजरित्या हारसुद्धा मानत नाही. माझ्या याच स्वभावामुळे कदाचित मी इंडस्ट्रीमध्ये इथवर येऊ शकलो", असं अर्शद म्हणतो. 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', 'इश्किया', 'गोलमाल' फ्रँचाइस, 'जॉली एलएलबी', 'सेहर' आणि 'असूर' यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमधून अर्शदने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT