Article 370 esakal
मनोरंजन

Article 370 Box Office Day 9: बॉक्स ऑफिसवर यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' चा धुमाकूळ; नऊ दिवसात केली एवढी कमाई

Article 370 Box Office Day 9: जाणून घेऊयात 'आर्टिकल 370' या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...

priyanka kulkarni

Article 370 Box Office Day 9: अभिनेत्री यामी गौतमचा  (Yami Gautam)  'आर्टिकल 370' (Article 370) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 23 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडली. शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...

बॉक्स ऑफिस कलेक्शन

'आर्टिकल 370' या चित्रपटातील यामी गौतमच्या अभिनयाचे अनेकजण कौतुक करत आहेत.या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या 9 व्या दिवशी 5.75 कोटींची कमाई केली आहे, या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन 44.35 कोटी रुपये झाले आहे.

यामीच्या 'आर्टिकल 370' या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर जगभर पसंती मिळत आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 8 दिवसांत 57.14 कोटींची कमाई केली आहे.

बजेट

'आर्टिकल 370' या चित्रपटाची निर्मिती अवघ्या 20 कोटींच्या बजेटमध्ये झाली आहे. या चित्रपटात यामी गौतमनं एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, तर अरुण गोविल यांनी या चित्रपटात पीएम मोदींची भूमिका साकारली आहे.

स्टार कास्ट

'आर्टिकल 370' या चित्रपटात प्रियमणी, किरण करमरकर यांच्यासह इतर कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे.

1 मार्च रोजी किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट देखील रिलीज झाला. पण 'आर्टिकल 370' या चित्रपटासमोर 'लापता लेडीज' या चित्रपटाची जादू दिसली नाही. या चित्रपटाने ओपनिंग-डेला 75 लाखांची कमाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT