arun gawli daughter yogita 
मनोरंजन

गँगस्टर अरुण गवळी होणार आजोबा; मुलीच्या घरी लवकरच हलणार पाळणा 

स्वाती वेमूल

गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता गरोदर असून पती अक्षय वाघमारेनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. मराठी अभिनेता अक्षय व योगिताने ८ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधली होती. लॉकडाउनमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर योगितासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं. 

'आयुष्याचा एक नवीन प्रवास लवकरच सुरू होणार आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहतोय', असं लिहित अक्षयने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. या फोटोमध्ये योगिताचा बेबी बंप पाहायला मिळतोय. 

अक्षय-योगिताची लव्हस्टोरी
अक्षय आणि योगिता हे लग्नाच्या आधी पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने 'बेधडक', 'दोस्तीगिरी' यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याची 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली होती. तर योगिता एका सामाजिक संस्थेसाठी काम करते. योगिताने काही मराठी चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. याचदरम्यान या दोघांची ओळख झाली आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 

लॉकडाउनमध्ये झालं लग्न
अक्षय आणि योगिता २९ मार्च २०२० रोजी लग्नबंधनात अडकणार होते. मात्र कोरोना महामारी आणि अचानक जाहीर झालेला लॉकडाउन यांमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. मे महिन्यात लॉकडाउनचे नियम थोडे शिथिल झाल्यानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत, सर्व नियम पाळत मुंबईतल्या दगडी चाळीत यांचा विवाहसोहळा पार पडला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT