Arun Govil, Dipika Chikhlia News Arun Govil, Dipika Chikhlia News
मनोरंजन

Ramayan : अरुण गोवील, दीपिका चिखलिया पुन्हा दिसणार राम-सीतेच्या भूमिकेत

दोन्ही कलाकार भगवान राम आणि सीतेची भूमिका साकारणार आहेत

सकाळ डिजिटल टीम

Arun Govil, Dipika Chikhlia News ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत भगवान राम आणि सीतेची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोवील (Arun Govil) आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया हे दिल्लीच्या रामलीलामध्ये अभिनय करताना दिसणार आहेत. कडकड्डूमा येथील रामलीलामध्ये हे दोन्ही कलाकार भगवान राम आणि सीतेची भूमिका साकारणार आहेत.

कडकड्डूमा येथील सीबीडी मैदानावर लीला आयोजित करणारे श्री हनुमंत धार्मिक रामलीला समितीचे सरचिटणीस ललित गोयल यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी धनुष्य तोडण्यापासून सीता स्वयंवर भागाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात दोन्ही कलाकार अरुण गोवील (Arun Govil) आणि दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) अभिनय करताना दिसणार आहेत. त्यादृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे.

दुसरीकडे, लाल किल्ल्यातील तीन मजली रंगमंचाच्या माधवदास पार्कमध्ये श्री धार्मिक लीला समितीच्या वतीने रामायण या मालिकेवर लीला रंगणार आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. रामलीला मचाणासाठी तीन मजली स्टेज तयार करण्यात येत आहे. रामलीला समिती यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत आहे.

‘पंडालमध्ये प्रवेश करण्यासाठी चार प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहेत. शताब्दीद्वार, वाल्मिकीद्वार, तुलसीद्वार आणि रामद्वार अशी त्यांची नावे आहेत’ असे समितीचे सरचिटणीस धीरजधर गुप्ता आणि मंत्री प्रदीप शरण यांनी सांगितले.

रामायण या मालिकेची झलक पाहायला मिळणार आहे. रावण जेव्हा लक्ष्मणरेषा ओलांडतो तेव्हा अग्नी प्रज्वलित केला जाईल. रावण-जटायू, राम-रावण, लक्ष्मण-मेघनाथ यांच्यात युद्ध होईल. हनुमानाने लंका जाळण्याबरोबरच लक्ष्मण जखमी झाल्यास संजीवनी बुटीही आणली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT