Rekha & Aruna Irani
Rekha & Aruna Irani Instagram
मनोरंजन

Aruna Irani यांचा अनेक वर्षांनी रेखा विषयी मोठा खुलासा..म्हणाल्या,'तिच्यामुळेच मला..'

प्रणाली मोरे

Aruna Irani : अभिनेत्री अरुणा ईराणी गेल्या पाच दशकांहून अधिककाळ मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी गंभीर,खलनायकी भूमिकांमधनंच नाही तर सोज्वळ,विनोदी धाटणीच्या भूमिकांमधूनही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

अरुणा ईराणी यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी १९८१ साली आलेल्या 'मंगलसूत्र' सिनेमातून आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याची एक आठवण शेअर केली आहे.

यामागचं कारण सांगताना त्यांनी सिनेमाची लीड अभिनेत्री रेखाच्या नावाचा खुलासा केला आहे. रेखानं निर्मात्याला सांगून आपल्याला सिनेमातून बाहेर काढलं होतं असं अरुणा ईराणी म्हणाल्या आहेत.(Aruna Irani reveals rekha ousted her from film mangalsutra)

अरुणा ईराणी म्हणाल्या, ''रेखा माझी खूप चांगली मैत्रिण होती. 'मंगलसूत्र' सिनेमात मला पहिल्या पत्नीची भूमिका होती, जी मेल्यानंतर भूत बनते. आणि रेखा दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत होती. पण रेखानं निर्मात्याला सांगून मला त्या सिनेमातून बाहेर काढण्यास सांगितलं.

जेव्हा मी निर्मात्याला याविषयी विचारलं तेव्हा त्यानं,' रेखाला मी त्या सिनेमात नको होती..मला काहीच अडचण नव्हती..;, असं उत्तर दिलं.

अरुणा ईराणी पुढे म्हणाल्या की,'' मग मी रेखाकडे त्याविषयी विचारपूस केली. मी म्हटलं,तुझ्यामुळे निर्मात्यानं मला 'मंगलसूत्र' सिनेमातून बाहेर केलं. तू असं का केलंस?''

तेव्हा ती म्हणाली,''अरुणा हे बघ, त्या सिनेमात जर तूझी भूमिका राहिली असती तर मला लोकांनी खलनायिका म्हणून पाहिलं असतं. म्हणून मला तो रोल तू करू नयेस असं वाटत होतं''.

यानंतर रेखा आणि अरुणा ईराणी यांच्यातील मैत्रीचं नातं पहिल्यासारखं राहिलं नाही.

हेही वाचा: रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

Rekha & Aruna Irani

'मंगलसूत्र' सिनेमाचं दिग्दर्शन विजय बी यांचे होते. १९८१ मध्ये बनलेला तो एक हॉरर सिनेमा होता. सिनेमात प्रेमा नारायण,मदन पुरी आणि ओम शिवपुरी सोपबर रेखा तसंच अनंत नाग मुख्य भूमिकेत होते.

हा सिनेमा १९७९ मध्ये आलेल्या 'ना निन्ना बिदालारे' या कन्नड सिनेमाचा रीमेक होता. अरुणा ज्यांनी ५०० हून अधिक सिनेमांतून काम केले आहे,त्यांनी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.

ज्यामध्ये 'पेट प्यार और पाप' आणि 'बेटा' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या दोन फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांपासून माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीपर्यंत मतमोजणीपूर्वीच 'या' राज्यात BJP 10 जागांवर विजयी; वाचा, नेमका काय आहे प्रकार

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

T20 World Cup : अमेरिकेतील वातावरण क्रिकेटमय; बास्केटबॉल, बेसबॉलच्या देशात क्रिकेटचा बोलबाला

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 2 जून 2024

Twenty20 World Cup 2024 : भारताचा बांगलादेशवर विजय; रिषभ, सूर्यकुमार हार्दिक चमकले

SCROLL FOR NEXT