Aryan Shahrukh Khan sakal media
मनोरंजन

आर्यन खान प्रकरण : जामीन अर्जावर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी

सुनिता महामुनकर

मुंबई : अमलीपदार्थ प्रकरणामुळे (Drug case) अडचणीत आलेल्या आर्यन खानच्या (Aryan khan) मुंबई उच्च न्यायालयातील (Mumbai high court) जामीन अर्जावर (bail application) मंगळवारी (ता 26) न्या नितीन सांब्रे (Nitin sambre) यांच्या पुढे सुनावणी होणार आहे. जामिनावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही न्यायालयाने एनसीबीला (NCB) दिले आहेत.

विशेष न्यायालयाने सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाचा आर्यनचा जामीन बुधवारी नामंजूर केला होता. त्यानंतर त्याच्या वतीने एड सतीश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आज तातडीच्या सुनावणीसाठी मानेशिंदे यांनी न्या सांब्रे यांच्या पुढे अर्जाचा उल्लेख केला. शुक्रवारी किंवा सोमवारी यावर सुनावणी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. न्या सांब्रे यांनी मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. तसेच एनसीबीने या अर्जावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता मंगळवारी यावर सुनावणी सुरू होऊ शकेल.

आर्यनसह आरोपी मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनीही उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावरही मंगळवारी सुनावणी होणार आहे. आर्यन कडे अमली पदार्थ सापडले नाही, त्याने अमलीपदार्थाचे सेवन केले नव्हते, केवळ व्हौटसप चैटवरुन त्याच्यावर आरोप केले जात आहेत, असा दावा आर्यनच्या वतीने करण्यात आला आहे. तर आर्यन या प्रकरणाच्या कटकारस्थानमध्ये आरोपी आहे असा गंभीर आरोप एनसीबीने केला आहे. मागीतली एकोणीस दिवस आर्यन कारागृहात असून दंडाधिकारी आणि विशेष न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केला आहे. क्रुझवर आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीत एनसीबीने छापा मारून आर्यनसह अकरा जणांना अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT