मनोरंजन

Drug case: आर्यनसोबत तुरुंगात असलेले अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा कोण आहे?

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईच्या किनाऱ्याजवळ (Mumbai coast) कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी (rave party) सुरु असताना शनिवारी NCB ने छापा मारला. या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचं (Drugs) कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला पोलिसांनी अटक केली आहे. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा सुद्धा अटकेत आहे. NCB ने कॉर्डेलिया क्रूझवरुन १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, २२ एमडीएमएच्या २२ गोळ्या जप्त केल्या आहेत.

अरबाज मर्चंट कोण आहे?

अरबाज मर्चंट पेशाने अभिनेता आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाचा जवळचा मित्र आहे. अरबाज आर्यन आणि सुहानासोबत अनेकदा पार्टी करताना दिसला आहे. कॉर्डेलिया क्रूझवर आर्यनसोबत अरबाजला अटक झाल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिघांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. अरबाज मर्चंट आल्या एफ बरोबर डेटींग करत असल्याच्या चर्चा होत्या.

मोहक जस्वाल, नुपूर सारीका आणि गोमीत चोप्रा या तिघांनाही अटक झाली असून ते दिल्लीचे रहिवाशी आहेत. रिपब्लिकवर्ल्ड वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. मोहक आणि नुपूर दोघे फॅशन डिझायनर आहेत. गोमित हेअर स्टायलिस्ट आहे. मुनमुन धामेचा फॅशन मॉडेल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT