Aryan Khan attends a party in Mumbai’s nightclub, video goes viral.  Instagram
मनोरंजन

NCB नं क्लीन चीट दिल्यावर आर्यन खानचा क्लबमधील 'तो' Video Viral, चर्चा सुरू

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षी क्रुझ ड्रग्ज प्रकरणात चांगलाच फसला होता.

प्रणाली मोरे

सुपरस्टार शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan) गेल्या वर्षी क्रुझ ड्रग्ज प्रकरणात(Drugs Case) चांगलाच फसला होता. या प्रकरणानं आर्यन खान हे नाव जगात गाजलं. बरेच महिने चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर एनसीबीनं आर्यन खानला क्लीन चीट दिली आहे. त्यानंतर आर्यनने पासपोर्ट परत करण्यासाठी केलेल्या याचिकेतही त्याच्या बाजूने कोर्टानं निर्णय दिल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. आता यासगळ्या जंजाळातून बाहेर आलेल्या आर्यनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय,ज्याची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय दिसतंय त्या व्हिडीओत?(Aryan Khan attends a party in Mumbai’s nightclub, video goes viral.)

आर्यन खानचा एका क्लबमध्ये पार्टी करतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. इन्टाग्राम आणि ट्वीटरवर वेगवेगळ्या पेजेसवर हा व्हिडीओ शेअर देखील झाला आहे. आर्यन कोणत्यातरी बारमध्ये गेलेला दिसत आहे. जिथे लाउड म्युझिक चालू असलेलं ऐकायला मिळत आहे. आणि अर्थात त्याच्या हातात मद्याचा प्याला देखील दिसत आहे. तोंडावर मास्क लावलेल्या आर्यनने जेव्हा मद्य पिण्यासाठी मास्क तोंडावरनं बाजूला केला तेव्हाच कुणीतरी त्याला बरोबर कॅमेऱ्यात बंदिस्त केलं.

आर्यन खानच्या ज्या फॅन पेजवर त्याचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे, त्यानुसार ही व्हिडीओ क्लीप सोमवार रात्री म्हणजे १८ तारखेची आहे असा अंदाज लावला जातोय. क्लबमध्ये आर्यन मित्रांसोबत एकदम मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. आर्यनला एन्जॉय करताना पाहून त्याचे चाहते मात्र खूश झालेले दिसत आहेत.

आर्यन खानविषयी बोलायचं झालं तर तो बीटाऊनचा एकदम कूल स्टारकिड आहे. आर्यन खानला पाहण्यासाठी देखील आजकाल मन्नतच्या बाहेर चाहते रेंगाळताना दिसतात. ड्रग्ज केस प्रकरणात फसल्यानंतर तर त्याला त्याच्या चाहत्यांचा खूपच पाठिंबा मिळाला. शाहरुखने देखील आपल्या मुलाला तुरुंगाबाहेर काढण्यासाठी काहीच कसर सोडली नाही. सगळ्यात चांगली गोष्ट घडली ती म्हणजे ड्रग्ज केसमधनं आर्यनला क्लीन चीट मिळाली,त्याचा पासपोर्ट त्याला परत मिळाले, आणि आता तो परदेशात सिने क्षेत्रासंबंधित पुढील शिक्षण आणि सोबत कामही करण्यासाठी रवाना होणार आहे. पण आता या क्लबमधल्या व्हिडीओ पुन्हा त्याच्या भोवती वादाचं जाळं विणू नये म्हणजे मिळवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL vs County Cricket वरून वातावरण तापलं! पीटरसनवर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची टिका, 'बस कर आता, मुर्खा...'

SIR वैधच! निवडणूक आयोगाला मतदार यादीतून नाव हटवण्याचा आणि समाविष्ट करण्याचा पूर्ण अधिकार : सुप्रीम कोर्ट

Earbuds Safety Tips : कानातले इअरबड्स बनतील 'जाजूस'; पर्सनल बोलणं होऊ शकतं लिक, त्यामुळं चुकूनही सुरू ठेवू नका 'ही' 1 सेटिंग

Gokul Milk Halal Clarification : गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र का घेतलं? परिपत्रकाद्वारे केला खुलासा; 'हलाल' शब्दाचा अर्थही सांगितला

Railway Ticket Price: रेल्वे तिकीटाचे दर वाढणार! प्रवाशांचा खिशाला फटका बसणार; रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT