Aryan Khan Bollywood Entry esakal
मनोरंजन

Aryan Khan Bollywood Entry: पोरावरचा डाग धुवून काढण्यासाठी शाहरुखचं खास प्लॅनिंग?

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा आता बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aryan Khan Bollywood king khan shahrukh son News: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा आता बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे. त्याच्या बॉलीवूडमध्ये इंट्री होण्याच्या बातमीनं चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, गेल्या काही महिन्यांपासून आर्यन हा वेगवेगळ्या वादात सापडल्याचे दिसून आले होते. ड्रग्ज प्रकरणात आर्यनला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता.

आर्यन जवळपास महिनाभर तुरुंगात होता. क्रुझवर पार्टीसाठी जाणे, तिथे ड्रग्ज सापडणे आणि त्यात आर्यनचे नाव येणे यासगळ्यात त्याच्यावर अनेक आरोप झाले होते. किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यनला अटक झाल्यानंतर बॉलीवूडकरांना मोठा धक्का बसला होता. काही करुन आर्यनला बाहेर काढण्यासाठी शाहरुखनं देशातील सर्वोत्तम वकीलांची फौज उभी केली होती. त्यामध्ये त्यानं शेवटी आर्यनला तुरुंगातून बाहेर काढलं. पण यासगळ्यात आर्यनच्या नावाची चर्चा ज्याप्रमाणात झाली त्यावरुन आता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

आर्यनला जामीन मिळाला आणि तो तुरुंगातून बाहेर पडला. दरम्यानच्या काळात त्याच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चाही झाली होती. त्याचे नाव अनेकांच्या ओठी आले होते. तब्बल तीन आठवड्यांहून अधिक काळ आर्यन खान हा वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत होता. किंग खानच्या चाहत्यांनी तर त्याच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यांनी शाहरुखला मोठा दिलासा होता. त्यावेळचे एकुण वातावरणच असे होते की, आर्यन खान हा राष्ट्रीय प्रश्न तयार झाला होता. त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचे व्यक्तिमत्व, त्याच्यावर असलेले आरोप आणि शाहरुखनचा मुलगा अशा दृष्टीकोनातून सहानुभूती असल्याचे दिसून आले होते.

शाहरुखकडून हे सगळं एका वेगळ्या कारणासाठी तर केले जात नाही ना अशा प्रकारच्या शंका त्यावेळी देखील नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात होत्या. आणि आता आर्यनच्या बॉलीवूडच्या इंट्रीनं त्यावर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ज्याप्रकारे वेगळ्या कॉन्ट्राव्हर्सीचा उपयोग केला जातो अगदी त्याचपद्धतीनं हे सगळं केलं गेलं का असा प्रश्न पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एनसीबीनं आपल्या युक्तीवादात तेव्हा सांगितलं होतं की, आर्यनकडून जे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते त्याची किंमत ही १ लाख ३३ हजार एवढई होती. २६ दिवसांच्या कोठडीनंतर तो २८ ऑक्टोबरला आर्यनला जामीन मिळाला होता.

आता आर्यन खान हा त्याच्या बॉलीवूड डेब्युसाठी तयार झाला आहे. आर्यननं स्क्रिप्टवरील काम संपवलं असून आता तो दिग्दर्शनासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला अॅक्टिंगमध्ये नव्हे तर दिग्दर्शनात रस आहे. शाहरुखनं देखील यापूर्वीच्या त्याच्या कित्येक मुलाखतीमध्ये त्याविषयी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT