Aryan Khan Case Esakal
मनोरंजन

Aryan Khan Case: 'आर्यन खानला अटक करण्यासाठीच वानखेडेंनी... ', NCB अधिकाऱ्याचा खुलासा

समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांच्या टिमने आर्यन खानला सोडवण्यासाठी खंडणीची मागणी केली असा आरोप होत असतांनाच आता लाचखोरी प्रकरणातील आरोपी माजी अधिकारी आशिष रंजन यांनी किरण गोसावीबाबात मोठा खुलासा केला आहे.

Vaishali Patil

Sameer Wankhede Case Update: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने समीर वानखेडेला सीबीआयच्या अटकेतून अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असून या प्रकरणात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. कथित ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला ज्योवेळी अटक करण्यात आली तेव्हा अधिकारी किरण गोसावी आणि आर्यन खानचा एक सेल्फी सोशल मिडियावर खुप व्हायरल झाला होता.

समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांच्या टिमने आर्यन खानला सोडवण्यासाठी खंडणीची मागणी केली असा आरोप होत असतांनाच आता लाचखोरी प्रकरणातील आरोपी माजी अधिकारी आशिष रंजन यांनी किरण गोसावीबाबात मोठा खुलासा केला आहे.

समीर वानखेडे यांच्या परवानगीनेच या प्रकरणात किरण गोसावी यांना देखील सामिल करण्यात आल्याचं त्याने सांगितलं.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकार्‍यांविरुद्ध सुरु असलेल्या सीबीआय खटल्यातील आरोपी आशिष रंजन प्रसाद यानी सांगतिल आहे की, वानखेडे यांनी अप्रुव्ह केल्यानंतरच या खटल्यात साक्षीदार झालेल्या किरण गोसावीला या केसमध्ये सामिल करण्यात आलं होते.

इतकच नाही तर आशीषने सीबीआयला दिलेल्या माहितीत आरोप केला की, ज्यावेळी क्रूझवरुन आरोपीला पकडण्यात आले त्यावेळी तिथे किरण गोसावी, प्रभाकर साईल आणि भाजप कार्यकर्ते मनीष भानुशाली यांच्या विषयी देखील चौकशी केली होती. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, वानखेडे यांच्या सूचनेवरुन ते तिथे पोहोचले होते.

तथापि, वानखेडे यांनी यापूर्वी गोसावी, प्रभाकर साईल आणि भाजप पक्षाचे कार्यकर्ते मनीष भानुशाली यांची ड्रग्ज प्रकरणाच्या दिवशी भेटल्याचे सांगितले होते. या प्रकरणाच्या तपास करणाऱ्या एसआयटीला या केसमध्ये अनेक चुका असल्याचं आढळून आलं आहे.

त्यामुळे क्रुझवर झालेलं ड्रग्ज प्रकरण हे नियोजित असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. 17 जूनला NCB ने माजी अधिकार्‍यांच्या दाव्याचे खंडन करत 92 पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवून अटक केल्याचा आरोप आहे.

त्याच्यांवर 25 कोटींची लाच मागीतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या अंतर्गत तपासानंतर एनसीबीने आर्यनविरुद्धचा खटला रद्द केला आणि पुराव्याअभावी त्याला कोर्टाने क्लीन चिट देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT