Aryan khan 
मनोरंजन

Drugs Case: आर्यन खान चार वर्षांपासून घेत होता ड्रग्ज

एनसीबी चौकशीदरम्यान त्याला कोसळलं रडू

स्वाती वेमूल

Drugs Case: ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला Aryan Khan नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) चौकशीदरम्यान रडू कोसळलं. आर्यन खानला रविवारी मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आर्यन ढसाढसा रडत असल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. आर्यन गेल्या चार वर्षांपासून ड्रग्जचं सेवन करत असल्याचीही माहिती समोर आली आहे. युके, दुबई आणि इतर देशांमध्ये असतानाही तो ड्रग्जचं सेवन करत असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली. आर्यनला वडील शाहरुखशी फोनवर दोन मिनिटं बोलण्याची संधी देण्यात आली होती.

क्रूझ सफारीवर रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या आलिशान क्रूझ सफारीच्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. नेमकी त्याची दखल एनसीबीच्या पथकाने घेतली आणि कारवाईचे सत्र सुरू झाले. मुंबई ते गोवा या तीन दिवसांच्या क्रूझ सफारीवर श्रीमंत घरची मुले सहभागी असल्याने अमली पदार्थ आणि रेव्ह पार्टीचे आयोजन असल्याचा संशय एनसीबीला आला. एनसीबीने सापळा रचून या क्रूझवर प्रवेश केला. पार्टी सुरू होताच दबा धरून बसलेले एनसीबी अधिकाऱ्यांनी अचानक छापे घालत कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केले व क्रूझवरील तरुणांना ताब्यात घेतले.

ड्रग्स आणण्यासाठी युक्ती

कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमएसारखे ड्रग्ज क्रूझवर आणण्यासाठी या पार्टीला आलेल्या प्रत्येकाने शक्कल लढविल्याचे तपासात उघडकीस आले. यात शाहरूख खानचा मुलगा आर्यन याने तर डोळ्याच्या लेन्सच्या डब्यातून ड्रग्ज नेल्याचे समोर आले, तर कुणी कंबरपट्टा, अंतर्वस्त्र आदींचा वापर केल्याचे एनसीबीच्या सूत्रांकडून समजते. पुरुषांच्या शर्टाची कॉलर, हाताच्या बाह्या, पॅन्टच्या कमरपट्ट्याजवळील शिलाई उसवून, महिलांच्या हँडबॅगच्या हँडलमध्ये लपवून अमली पदार्थ आणले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT