Sameer Wankhede Case Update:  Esakal
मनोरंजन

Sameer Wankhede Case Update: आरोपांचे ढग दाटतायत! शाहरुखसोबत केलेली चॅटिंग न्यायालयात दाखवणं समीर वानखेडेला पडलं महागात

Vaishali Patil

Sameer Wankhede Case Update: गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे चर्चेत आले आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स केस प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे.आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ करोडची डील केल्याचा आरोपही वानखेडेवर करण्यात आला आहे.

बेहिशोबी मालमत्ता आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांची शनिवारी ५ तास चौकशी केली. आज पुन्हा सकाळी 11 वाजता समीर वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

याप्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानसोबतच्या चॅट न्यायलयात साद केली. ही चॅटिंग समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसोबत जोडली होती. मात्र आता याप्रकरणी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना खडसावलं आहे. हे पूर्णपणे नियमांच्या विरोधात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हाय-प्रोफाइल क्रूझ प्रकरणाच्या तपासादरम्यान समीर वानखेडेने उच्च न्यायालयात त्यांच्या बचावात चॅट्स सादर करून वर्तन नियमांचे उल्लंघन केलं असल्याच एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

वानखेडे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा एनसीबीच्या सूत्रांनी केला आहे. या प्रकरणी ते म्हणाले की, कोणताही तपास अधिकारी आरोपीच्या कुटुंबीयांशी एवढी चॅटिंग कशी काय करू शकतात? आर्यन खान प्रकरणाच्या तपासादरम्यान, समीर वानखेडेने शाहरुख खानसोबतच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सबाबत आपल्या वरिष्ठांना कधीही माहिती दिली नाही.

ते म्हणाले की वानखडे यांनी या चॅटिंगची माहिती वरिष्ठांना दिली नाही किंवा रेकॉर्डवर ठेवली नाही. "या चॅट्सबद्दल त्याची चौकशी करणाऱ्या दक्षता पथकालाही त्यानी याबबात सांगितले नाही," असे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखडे यांनी ज्या फोनद्वारे शाहरुख खानशी चॅट केली होती. तो फोन उपलब्ध करून दिला नाही आणि यासोबतच या प्रकरणाचा ताबा घेतल्यानंतर एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला घाबरवण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात सीबीआय केलेल्या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

मुंबई उच्च न्यायालयात 22 मे रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. दरम्यान आजही त्यांची चौकशी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT