aryan khan, hrithik roshan 
मनोरंजन

आर्यन खान प्रकरणावर हृतिकची आणखी एक पोस्ट; व्यक्त केली नाराजी

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हृतिकने एका प्रसिद्ध पत्रकाराचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं,...

स्वाती वेमूल

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या Aryan Khan जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने बुधवारी तहकूब केली. याप्रकरणी आज, गुरुवारीही सुनावणी होणार आहे. आरोपींना अटक करण्यापूर्वी अटकेची कारणं तपास यंत्रणेकडून सांगणं अपेक्षित होतं. मात्र, योग्य कारण न देताच अटक करून केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्याचा दावा आर्यनसह तिघांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. याप्रकरणी पुन्हा एकदा अभिनेता हृतिक रोशननचे Hrithik Roshan त्याचं मत मांडलं आहे. याआधीही हृतिकने आर्यनसाठी भलीमोठी पोस्ट लिहिली होती.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हृतिकने एका प्रसिद्ध पत्रकाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पत्रकार फाये डिसूझाने सर्वोच्च न्यायालयाचे वकील दुष्यंत दवे यांची मुलाखत शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती नितीम सांबरे यांनी यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्यांना जामीन कसा मंजूर केला, याचा उल्लेख करत या प्रकरणावर आपलं मत मांडलं. हाच व्हिडिओ शेअर करत हृतिकने लिहिलं की, “जर यात तथ्य असेल तर, हे खरोखरंच दुःखद आहे.”

हृतिकने याआधी एक पोस्ट लिहित आर्यनला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. 'मी तुला लहानपणापासून ओळखतो. जे काही तू अनुभवतोय, त्या सर्वांचा स्वीकार कर. शांत रहा, निरीक्षण करत रहा. टॉमला घडवण्यासाठी हे क्षण महत्त्वाचे आहेत आणि टॉम पुन्हा एकदा सूर्यासारखा चमकणार आहे. पण त्यासाठी तुला आधी अंधारातून जावं लागेल', अशी पोस्ट हृतिकने लिहिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan IMD Alert : १५० किमी वेगाने धडकणार महाकाय चक्रीवादळ! अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, 'या' राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट; महाराष्ट्रात काय होणार परिणाम?

Mumbra News: धक्कादायक! मिठाई खाल्ल्यानंतर 5 जणांना त्रास, एकाचा मृत्यू; मुंब्र्यात खळबळ

Foreign YouTuber Viral Video : "सेल्फी नको, मला एक Kiss दे..." प्रसिद्ध पर्यटनस्थळी विदेशी युट्यूबरकडे तरुणाची धक्कादायक मागणी; लाईव्ह स्ट्रीममधील 'तो' व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले!

India US AI Security Pact: AI सुरक्षेसाठी भारत-अमेरिकेसह 10 देश एकत्र; चीनच्या तंत्रज्ञान वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी नवा करार

Latest Marathi News Update : अमित शाहांच्या स्वागतासाठी पुण्यात बॅनरबाजी; भाजपपेक्षा शिंदेसेनेच्या बॅनर्सचीच जास्त चर्चा

SCROLL FOR NEXT