Manushi Chillar Video Esakal
मनोरंजन

Manushi Chillar Video: आर्यनच्या बॉडीगार्डने विश्वसुंदरी मानुषीला दिला धक्का, शाहरुखच्या लेकावर भडकले नेटिझन्स

Vaishali Patil

 Manushi Chillar Aryan Khan Video: मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ही कायमच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. 2017 मध्ये मानुषीने मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. 18 नोव्हेंबर 2017 रोजी चीनमधील सनाया येथे झालेल्या स्पर्धेत मानुषीने हे विजेतेपद पटकावले.

त्यानंतर अक्षय कुमारसोबत तिने 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या ती विकी कौशलच्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटामुळे चर्चेत होती. नुकताच मानुषी छिल्लरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तिच्यासोबत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही दिसत आहे.

मात्र या व्हिडिओत आर्यनच्या बॉडिगार्डने असं काही केलं की त्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. या व्हिडिओमध्ये आर्यन खान पार्टीतून बाहेर पडताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत शाहरुख खानच्या लेकासाठी रस्ता मोकळा करताना आर्यनच्या बॉडीगार्डने मानुषी छिल्लरला धक्का दिला. यावेळी मानुषी पडता पडता वाचली आणि तिच्या शेजारील व्यक्तीने तिला सावरले.

त्यावेळी आर्यन खानने तिच्याकडे दुलर्क्ष केले आणि पुढे निघून गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. आर्यन आणि त्याच्या बॉडिगार्डचा हा उद्धटपणा नेटिझन्सला मुळीच आवडलेला नाही. त्यांनी आर्यनला चांगलेच फटकारले आहे.

"कुठे विश्वसुंदरी मानुषी छिल्लर आणि कुठे तो", "आर्यन खानने सुरक्षा रक्षकाला अडवले पाहिजे होते", "मानुषी छिल्लर किंवा अशा कोणत्याही महिलेला हात लावण्याची हिंमत सुरक्षा कर्मचार्‍यांची कशी होऊ शकते?", "केवळ वडिल शाहरुख खान असल्याने त्याला लोक ओळखतात मात्र ती विश्वसुंदरी आहे" अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर नेटकरी करत आहे. तर काहींनी आर्यन खानची बाजू घेतलीआहे. इतक्या गर्दीत त्याचे लक्ष नसेल असं देखील नेटकरी म्हणत आहे.

मानुषी छिल्लरच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर मानुषी या वर्षीचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' मध्ये वरुण तेजासोबत काम करत आहे. हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.


तर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर त्याने आता आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याने स्वतःचा लक्झरी क्लोदिंग ब्रँड उघडला आहे. आर्यन खान दिग्दर्शनातही पदार्पण करणार आहे. तो एका वेब सीरिजचे दिग्दर्शन करत आहे. याआधी त्याने 'द लायन किंग'मधील सिम्बाच्या व्यक्तिरेखेसाठी व्हॉईस ओव्हर दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे, राज ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT