asha bhosle shared video she cooking dum biryani in her asha's restaurant in dubai  sakal
मनोरंजन

आशा भोसलेंनी केली दम बिर्याणी, तेही स्वतःच्या हॉटेलात.. पाहून तोंडाला..

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या दुबई येथील रेस्टॉरंटमध्ये जाऊन हा बेट आखला आहे.

नीलेश अडसूळ

asha bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आवाज आणि अजरामर गाणी यांचे तर आपण चाहते आहोतच. पण त्या पलीकडेही आशा भोसले एक मोठा आदर्श म्हणता येतील. आजवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे आली, अनेक मोठे धक्के आले पण त्यातून त्या सावरल्या. केवळ सावरल्या नाही तर परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी त्यातूनही झेप घेतली. मध्यंतरी त्यांच्या ज्येष्ठ भगिनी गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन असो किंवा मुलाच्या प्रकृतीची चिंता अशा अत्यंत तणावपूर्वक वातावरणातून जाऊनही त्या स्वतःला सावरत आहेत. विशेष म्हणजे त्या कधीही थांबत नाहीत. अशा सदा प्रफुल्लित राहणाऱ्या आशाताईंनी आज चक्क बिर्याणीचा घाट घातला आहे, आणि एक खास विडिओ शेयर केला आहे. (asha bhosle shared video she cooking dum biryani in her asha's restaurant in dubai)

आशा ताई बिर्याणी बनवणार हे पाहून आश्चर्य वाटलं असेल, पण ते खरं आहे. आशा भोसले यांनी खमंग दम बिर्याणी बनवली आहे, तेही स्वतःच्याच हॉटेलात जाऊन. होय, स्वतःच्या हॉटेलात. त्या केवळ गायिका नाहीत, तर या पलीकडे त्यांचे इतरही बरेच व्यवसाय आहेत. त्यातीलच एक म्हणजे 'आशाज रेस्टॉरंट'. दुबई मधील 'wafi' या जगप्रसिद्ध मॉलमध्ये आशा यांचे हे रेस्टॉरंट आहे. अत्यंत भव्य दिव्य असे हे रेस्टॉरंट पाहून सामान्य माणसांचे डोळे दिपतील आणि याच रेस्टॉरंटमध्ये आशाताई चक्क बिर्याणी बनवताना दिसत आहेत.

आशा भोसले यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये त्या चक्क हातात माइक ऐवजी उलातने(कालथा) घेऊन उभ्या आहेत. विशेष म्हणजे हॉटेलच्या मालकीण असलेल्या आशा भोसले आज चक्क शेफचे कपडे घालून दम बिर्याणी बनवताना दिसत आहेत. बिर्याणी तयार झाली असून आशा ताई त्यावर / शेवटचा हात फिरवत आहेत, असे या व्हिडिओत दिसते. या व्हिडिओला आशा ताईंनी 'आओ ना, गले लगालो ना' हे त्यांच्याच गाण्याचे संगीत दिले आहे. शिवाय 'माझ्या दुबई येथील आशाज रेस्टॉरंट मध्ये येऊन मला भेटा' असे कॅप्शनही त्यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यात संतापजनक घटना! १२ वर्षीय मुलीवर वडील अन् काकांचा अत्याचार, शेजारच्या वृद्धाने लचके तोडले...

जावई असलास तरी चुकीला माफी नाही! अर्जुन बहिणीची फसवणूक करणाऱ्या सचिनच्या कानाखाली जाळ काढणार, नेटकरी म्हणतात-

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात लोखंडी साहित्यांनी भरलेला ट्रक पलटी; पाठोपाठ कारचाही अपघात, धोकादायक वळणं ठरताहेत जीवघेणी!

Chhatrapati Sambhajinagar News : २५ हजारांचा बकरा अन् २.५० लाखांची म्हैस! जनावरांच्या बाजारात बरबरी, बेंडॉमचा बोलबाला

Shreyas Iyer Fitness Update : श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर, न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी संघात परतणार?

SCROLL FOR NEXT