Asha Kale renowned Marathi actress Life Time  esakal
मनोरंजन

Asha Kale : ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्याविषयीची एक गोड बातमी आता समोर आली आहे. यंदा त्यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Asha Kale renowned marathi actress Life Time Achievement : मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या अभिनयाचे हजारो चाहते आहेत. ८० च्या दशकांती मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे यांनी आपल्या अभियनानं मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्याविषयीची एक गोड बातमी आता समोर आली आहे. यंदा त्यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सर्व कलाकारांचे श्रद्धास्थान तसेच रसिकांचे आदराचे स्थान आहे. दरवर्षी या वास्तूचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यंदाचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा खास ठरणार आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

२६ जून रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर पुढील तीन दिवस २८ जून पर्यत विविध कलात्मक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे.

त्यात प्रामुख्याने जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडीच्या करामती, प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांची मुलाखत, मनिषा लताड प्रस्तूत हिटस् ऑफ लता मंगेशकर व आर. डी. बर्मन संगीत रजनी, पारंपारिक भारूड या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

Asha Kale renowned Marathi actress Life Time

याशिवाय महिलांसाठी मंगळागौर, फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव, शाहीर दादा कोंडके यांच्या ढंगात 'दादांची आठवण आली का', द इन्स्ट्रुमेंटल आर.डी., तसेच चर्चासत्रात थेट भेट नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी सौमित्र पोटे यांनी साधलेला संवाद आणि यावर्षी पहिल्यांदाच मास्टर जयसिंग पाचेगांवकर सह लता-लंका पाचेगांवकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण होणार आहे.

त्याचबरोबर बालगंधर्व परिवाराची आनंदवारी-गंधर्वदारी हा भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम, बालनाटिका जिर्णोद्धार, प्रसिद्ध व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांचे 'शिवचरित्रातून काय शिकावे' या विषयावर व्याख्यान, महाराष्ट्रात गाजत असलेल्या लोकगीतांचा कार्यक्रम 'आवाज महाराष्ट्राचा' लोकप्रिय गायिका राधा खुडे आणि सहभागी कलाकार त्यानंतर पारंपारिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम यावेळी पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking! भारताविरुद्ध पाकिस्तान T20 World Cup मधील सामना खेळणार नाही, PCB कडून निर्णय जाहीर

U19 World Cup: भारताची सेमीफायनलमध्ये दणक्यात एन्ट्री; पाकिस्तानला NRR चं गणित सुटलंच नाही, स्पर्धेतील आव्हान संपलं

Employees Salary: सुमारे ६८,००० कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले, राज्य सरकारचा आक्रमक निर्णय, कारण आलं समोर, प्रकरण काय?

Sharad Pawar: गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला! सिल्व्हर ओक निवासस्थानी सांत्वन भेट

Manipur Government Formation Update: मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग!, भाजपसह सर्व ‘NDA’ आमदारांना दिल्लीला बोलावले

SCROLL FOR NEXT