ashish vidyarthi, ashish vidyarthi news, ashish vidyarthi wedding, rajoshi vidyarthi SAKAL
मनोरंजन

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थींनी फसवणूक केली का? अखेर पहिल्या बायकोने मनातल्या भावना सांगितल्याच

आशिष यांनी पहिली बायको राजोशी विद्यार्थी यांची फसवणूक केली अशीही चर्चा झाली.

Devendra Jadhav

Ashish Vidyarthi First Wife Open Up About Wedding News: दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी काहीच दिवसांपूर्वी दुसरं लग्न केलं. आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्या पहिल्या बायकोचं हार्टब्रेक झालं अशी चर्चा कालपासून सुरु होती. याशिवाय आशिष यांनी पहिली बायको राजोशी विद्यार्थी यांची फसवणूक केली अशीही चर्चा झाली. आता या सर्व चर्चांवर आशिष विद्यार्थी यांची पहिली बायको यांनी मौन सोडलंय.

(ashish vidyarthi first wife piloo rajoshi vidyarthi talk about matters of heart)

राजोशी म्हणाली.."ही 22 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होते. जर तुम्ही आशिषला विचाराल तर तो कदाचित तेच सांगेल," राजोशी पुढे म्हणाली..

"तो एक अप्रतिम जोडीदार आहे आणि आम्ही अनेक वर्षांपासून एकत्र प्रवास केला आहे. आमच्यात खूप सामायिक आवडी होत्या. साहजिकच, इतर लोकांप्रमाणे आमच्या काही आवडी - निवडीही वेगळ्याही होत्या. पण आमच्यात कधीच संघर्ष झाला नाही कारण मुळात आम्ही अगदी सारखेच आहोत. आम्ही अजूनही तसेच आहोत. आम्हाला एकक सुंदर मुलगाही आहे." असं राजोशी म्हणाली.

राजोशी यांनी आशिष यांचं लग्न झाल्यावर दोन पोस्ट केल्या होत्या. राजोशी यांनी लिहिलं की, 'योग्य व्यक्ती तुम्हाला प्रश्न करणार नाही की तुम्ही त्याच्यासाठी किती महत्वाचे आहात. तुम्हाला ज्याचा त्रास होईल अशी कृती ते मुळीच करणार नाही हे लक्षात ठेवा."

राजोशी यांनी पुढे लिहिलं की.. 'आता अती विचार आणि संशय तुमच्या डोक्यातुन निघुन गेला असावा. स्पष्टतेने गोंधळाची जागा घेतली असावी. शातंता आणि संयम तुमच्या आयूष्यासा पुर्ण करेल.

तुम्ही खुप काळापासून मजबूत बनला आहे,आता वेळ आली आहे की आता तुम्हाला आशिर्वाद मिळावा कारण तुम्ही ते डिझर्व करतात.

दरम्यान आशिष विद्यार्थी यांनी दुसरी बायको रुपाली या आसामच्या राहणाऱ्या आहेत. रिपोर्ट्सनुसार रुपालीनं सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच त्यांची आणि आशिष विद्यार्थी यांची भेट झाली होती. ज्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

दरम्यान आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी २५ मे,२०२३ रोजी कोलकाता येथे आपलं कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT