ashutosh patki 
मनोरंजन

पिक्चर अभी बाकी है! मालिका संपल्याने 'बबड्या' झाला भावूक

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधीतच चर्चेत आली. यातील आसावरी, अभिजीत, शुभ्रा आणि बबड्या हे पात्रं प्रेक्षकांना चांगलेच लक्षात राहणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याच्या जागी 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या बदललेल्या मालिकेत आसावरी आणि अभिजीत यांच्या भूमिका त्याच असल्या तरी शुभ्रा आणि बबड्या बदलले आहेत. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला निरोप देताना बबड्याची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्की याने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. 

काय आहे आशुतोषची पोस्ट- 
'सोहम उर्फ बबड्या.. काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम एक नंबरवर असेल माझ्यासाठी, कारण अग्गंबाई सासूबाई ही मालिका मला खूप काही शिकवून गेली. मराठी भाषेपासून, कलाकाराने कॅमेरासमोर भावना कशा व्यक्त कराव्यात आणि लोकांच्या मनाचा कसा ठाव घ्यावा हे या मालिकेने शिकवलं. सगळ्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात खूप शिकलो. सगळ्यांनी मला मनापासून सांभाळून घेतलं यासाठी मी खूप आभारी आहे. झी मराठी आणि आमचे निर्माते सुनील भोसले यांचा मी आभारी आहे की सोहम म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक तुम्हीसुद्धा खूप प्रेम दिलंत. हे पहिलं पर्व संपताना सगळा प्रवास आठवतो. खूप आठवण येईल सगळ्यांची पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. लवकरच एक नवीन चेहरा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन आणि पुन्हा नव्याने तुमच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करीन.'

या पोस्टच्या शेवटी आशुतोषने नव्या मालिकेला शुभेच्छा दिल्या आहेत. या नव्या पर्वात सोहमची भूमिका अभिनेता अद्वैत दादरकर साकारणार आहे. अद्वैतने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत सौमित्रची भूमिका साकारली होती. या मालिकेनेसुद्धा नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT