ASK SRK:  Esakal
मनोरंजन

ASK SRK: "पीआर टीममुळे तुझे टुकार सिनेमे ब्लॉकबस्टर झाले..." नेटकऱ्याने घेतला पंगा तर किंग खाननेही दाखवला इंगा!

शाहरुख खानने डंकी निमित्त #askSRK सेशन केलं.

Vaishali Patil

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान नंतर आता त्याची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदापर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुहाना 'द आर्चिज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

तर दुसरीकडे शाहरुख खान देखील त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुख लवकरच डंकी या चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट 21 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखचा हा सिनेमा यावर्षीचा तिसरा मोठा हिट सनेमा असल्याचे बोलले जात आहे. यावर्षी शाहरुखचे जवान आणि पठाण हे दोन सिनेमे सुपरहिट ठरले होते. त्यामुळे आता चाहत्यांच्या नजरा डंकी चित्रपटाकडे लागल्या आहेत. शाहरुख खान सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

शाहरुखने नुकतच त्याच्या चाहत्यांसोबत ASKSRK सेशल घेतलं. या दरम्यान चाहत्यांनी नेहमी प्रमाणे शाहरुखला खुप सारे प्रश्न विचारले. मात्र यावेळी एका चाहत्याने शाहरुखला असा काही प्रश्न विचारला की त्यामुळे किंग खान थोडासा नाराज झाला. तरी देखील शाहरुखने या प्रश्नाचे उत्तर दिले.

शाहरुख खानने बुधवारी त्याच्या चाहत्यांसाठी त्याच्या X वर ASK SRK सत्र आयोजित केले. यात एका नेटकऱ्याने त्याला विचारले की, तुझ्या पीआर टीममुळे तुमचे शेवटचे दोन टुकार  चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलं. तुला अजूनही तुझ्या पीआर आणि मार्केटिंग टीमवर विश्वास आहे का की 'डंकी'ही हिट होईल?.. बॉलिवूडच्या आणखी एका टुकार चित्रपटाला एक गोल्डन फिल्म बनवली जाईल.”

या नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणाला, "मी तुमच्यासारख्या बुद्धिमान लोकांना उत्तर देत नाही. परंतु मी तुम्हाला हे सांगेन की, तुम्हाला कदाचित बद्धकोष्ठतेच्या (अपचनाच्या) समस्येने ग्रासले आहे. यावर उपचार करणं खुप आवश्यक आहे. म्हणून मी माझ्या पीआर टीमला तुम्हाला चांगले औषध आणि उपचार देण्यास सांगेन... आशा आहे तुम्ही लवकर बरे व्हाल."

सध्या शाहरुखच्या या ट्विटची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. नेटकरी शाहरुखचे कौतुक करत आहेत. शाहरुख सध्या डंकी निमित्ताने ट्विटरवर #askSRK निमित्ताने चाहत्यांच्या संपर्कात असतो.

'डंकी' हा चित्रपट शाहरुखचा या वर्षातील तिसरा मोठा आणि बहुप्रतिक्षित असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू आणि विकी कौशल सारखे लोकप्रिय कलाकारही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणार आहे.

शाहरुखचा डंकी ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती - अतुल सावे

SCROLL FOR NEXT