Astad kale and aditi sarangdhar comes together after seven years in charcha tar honarch marathi drama sakal
मनोरंजन

Aastad Kale: चर्चा तर होणारच! आस्ताद काळे आणि आदिती सारंगधर एकत्र..

आस्ताद आणि आदिती रंगभूमीवर जवळपास सात वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

नीलेश अडसूळ

काहीजण हे चर्चेचा विषय असतात तर चर्चेत राहण्यासाठी हल्ली कोण काय करतील? याचाही नेम नसतो. सध्या मात्र नाटयवर्तुळात एक वेगळीच जोरदार ‘चर्चा’ रंगली आहे. आदिती सारंगधर, क्षितिज झरापकर आणि आस्ताद काळे एकत्र आल्याने ही ‘चर्चा तर होणारच’ होती. पण या तिघांनी नेमकं काय केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे...

(Astad kale and aditi sarangdhar comes together after seven years in charcha tar honarch marathi drama)

तर १९ नोव्हेंबरला या प्रश्नाचं उत्तरं या तिघांकडूनच मिळणार आहे. या त्रिकुटाच्या 'चर्चा तर होणारच!' या नव्या नाटकाचा शुभारंभ १९ नोव्हेंबर शनिवार सायं ५ वाजता बालगंधर्व, पुणे येथे होणार आहे. तर २० नोव्हेंबर रविवार रात्रौ ८.३०वा. ठाणे येथील गडकरी रंगायतनला दुसरा प्रयोग सादर होईल. रंगनील व वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत हे नवं नाटकं रंगभूमीवर येतयं. लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांची ही नाटयकृती आहे. कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या नाटकाचे निर्माते आहेत.

चर्चेत राहण्यासाठी आम्हाला सिर्फ नाम ही काफी हैं... ‘चर्चा तर होणारच’! अशी जाहिरात करत रंगभूमीवर खमंग ‘चर्चा’ घडवायला येत असलेल्या या नाटकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चर्चा तर होणारच! हे नर्मविनोदी अंगाने सामजिक भाष्य करणार ख़ुशखुशीत नाटकं आहे. प्रपोझल या नाटकानंतर आदिती सारंगधर आणि आस्ताद काळे ही जोडी सातवर्षाने या नाटकाद्वारे रंगभूमीवर एकत्र येत आहे. एका स्पर्धेच्या निमित्ताने घडणारं चर्चासत्र त्यात बाजी मारण्यासाठी झालेल्या युक्त्या, कुरघोड्या आणि त्यातून रंगणारं धमाल,क्लासिक,मिश्किल नाटक म्हणजे चर्चा तर होणारच!

चर्चा तर होणारच! नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. संगीत राहुल रानडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT